काळ नदीतील दूषित पाणीप्रश्न गंभीर
By admin | Published: May 31, 2017 06:11 AM2017-05-31T06:11:08+5:302017-05-31T06:11:08+5:30
काळ नदीमध्ये शहरातील मोठमोठ्या गृहप्रकल्प इमारतीचे सांडपाणी सोडण्यात आल्याने ही नदी अत्यंत दूषित झाली असून, या नदीच्या पा
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : काळ नदीमध्ये शहरातील मोठमोठ्या गृहप्रकल्प इमारतीचे सांडपाणी सोडण्यात आल्याने ही नदी अत्यंत दूषित झाली असून, या नदीच्या पाण्याला उग्र वास येत असल्याने ते पाणी आंघोळीला घेण्यासाठी देखील नागरिक कचरत आहेत. या दूषित पाण्याला नियमबाह्य परवानगी देणारी माणगाव नगरपंचायत हीच कारणीभूत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत कृती समितीने अधिक आक्र मक भूमिका घेताना या प्रश्नाबाबत रायगड जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार यांनी मुंबई येथे काँग्रेस भवनात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. हा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न असून याबाबत आपण प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्र ार दाखल करा, त्यांच्याकडे मी देखील बोलून घेतो, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ज्ञानदेव पवार यांना सांगितले.
या दूषित पाणीप्रश्नाबाबत आमदार सुनील तटकरे यांनी कृती समिती माणगाव व नगरपंचायतीच्या समवेत नगरपंचायत कार्यालयात १५ दिवसांपूर्वी बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. माणगाव नगरपंचायतीकडून काही बिल्डरांवर थातूरमातूर कारवाई करून कृती समितीची समज काढण्याचा प्रयत्न केला गेला. कारवाई करताना इमारतींच्या जलवाहिन्या तोडून टाकण्यात आल्याचे व कारवाई केल्याचे कृती समितीला भासविण्यात आले. तोडलेल्या या जलवाहिन्या लगेचच दुसऱ्या दिवशी जोडण्यात आल्याने माणगावकर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. काही इमारतींच्या गटारांमध्ये नागरिकांचे समाधान करण्यासाठी थोडीशी माती टाकण्यात आली आहे. परंतु सद्यस्थिती पाहता अजूनही काळनदीत जाणारे गटारांचे सांडपाणी नगरपंचायतीने बंद केलेले दिसत नाही. कृती समितीला व माणगावमधील पत्रकारांना वेळ मारून नेण्यासाठी लेखी पत्राद्वारे काम करण्याचे आश्वासन देऊन आजपर्यंत केवळ दिशाभूलच केली आहे. या गंभीर प्रश्नाबाबत कृती समिती माणगाव यांची २ जून रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून हा प्रश्न आता गंभीर रूप धारण करू लागला आहे.
नुकतीच पाच दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील टेमपाले येथे दूषित पाण्यामुळे कावीळचे २३ रु ग्ण आढळून आले. आता त्याठिकाणी साथ आटोक्यात आहे. या भीषण प्रश्नाबाबत कृती समितीने आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्कृती समिती माणगावचे कार्यकर्ते ज्ञानदेव पवार, बाळशेठ घोणे, सुरेंद्र साळी, सुरेश मोहिते, सलीम शेख, मजीद हाजिते आदींनी व्यक्त के ला.