गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, मोठा अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 10:17 AM2021-05-22T10:17:59+5:302021-05-22T10:18:44+5:30

आगीवर वेळीच नियंत्रण; मोठे अनर्थ टळले

The truck carrying the gas cylinder caught fire in thane, averting a major catastrophe | गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, मोठा अनर्थ टळला 

गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, मोठा अनर्थ टळला 

googlenewsNext
ठळक मुद्देहरी ओम रोडवाईस मालकीचा ट्रक असून तो ट्रक त्यावरील चालक मनोहर जाधव हे शनिवारी पहाटे उरण येथून तब्बल २९४ घरगुती भारत पेट्रोलियमचे गॅस सिलिंडर भरून नालासोपारा येथे निघाले होते

ठाणे : घरगुती गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी ठाण्यातील कळवा-विटावा परिसरात घडली. सुदैवाने, वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आल्याने स्थानिक आणि तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हरी ओम रोडवाईस मालकीचा ट्रक असून तो ट्रक त्यावरील चालक मनोहर जाधव हे शनिवारी पहाटे उरण येथून तब्बल २९४ घरगुती भारत पेट्रोलियमचे गॅस सिलिंडर भरून नालासोपारा येथे निघाले होते. नवी मुंबई मधून ठाणे मार्गे जाताना जाधव हे ट्रक कळवा-विटावा येथून विटावा रेल्वे ब्रीज खालून जाण्यापूर्वी त्यांना ट्रकच्या इंजिनमधून धूर येत असल्याची बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला माहिती दिली. त्यानुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत, त्या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठे अनर्थ टाळण्यात अग्निशमन दलाला यश आले. 

घटनेची माहिती मिळताच आपत्ती कक्ष कर्मचारी, पोलीस यांनी धाव घेतली होती. तसेच यावेळी एक फायर इंजिन आणि एक रेस्क्यू गाडीला पाचारण केले होते. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सिलेंडर ट्रकला आग लागल्याचे समजता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटनेवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Web Title: The truck carrying the gas cylinder caught fire in thane, averting a major catastrophe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.