पैशाच्या वादातून ट्रक चालकाची हत्या करणाऱ्या क्लीनरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:16 PM2019-01-22T21:16:47+5:302019-01-22T21:21:18+5:30

दीड महिन्यांचा पगार आणि लोखंडी सळई विक्रीतील पैसे न दिल्याने ट्रक चालक अनुज पांडे याचा क्लीनर रिजवान शेख याने खून केल्याची घटना ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. रिजवान याला आता अटक करण्यात आली आहे.

Truck cleaner arrested for murder of driver | पैशाच्या वादातून ट्रक चालकाची हत्या करणाऱ्या क्लीनरला अटक

अवघ्या २४ तासांमध्ये लागला छडा

Next
ठळक मुद्देठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईअवघ्या २४ तासांमध्ये लागला छडालोखंडी रॉड डोक्यात टाकून केली होती हत्या

ठाणे: पैशाच्या वादातून ट्रक अनुज पांडे (३५, रा. मानकोली, भिवंडी) या चालकाचा त्याच्याच ट्रकवरील क्लीनर (सहाय्यक) रिजवान अली शेख (१९, रा. छेडानगर, मानखूर्द लिंक रोड, घाटकोपर) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याला २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई नाशिक राष्टÑीय महामार्गावरील किन्हवली फाटयाजवळ उड्डाणपूलावर एका ट्रकमध्ये चालकाची डोक्यात प्रहार करुन कोणीतरी हत्या केल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे, उपनिरीक्षक बजरंग राजपूत आणि पोलीस नाईक गणेश पाटील यांचे पथक तपास करीत असतांना त्यांना या चालकाची माहिती ट्रान्सपोर्ट कंपनीच्या इतर कर्मचाºयांकडून मिळाली. अनुज याच्यासोबत रिजवान आणि त्याचा साथीदार राहूल हेही होते, अशी माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे त्यांनी मुंबईच्या घाटकोपरमधून रिजवानला १८ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्याला बोलते केल्यानंतर गेल्या दीड महिन्याचा पगार आणि लोखंडी सळई विक्रीतून आलेले पैसे यात दोघांमध्ये वाद होता. हे पैसे अनुज त्याला वारंवार तगादा लावूनही देत नव्हता. १६ जानेवारी रोजी उरण येथून त्यांनी नाशिकला नेण्यासाठी काही माल भरला. सायंकाळी ५ वा. भिवंडीच्या पडघा टोल नाका ओलांडल्यानंतर एका ढाब्यावरच त्यांनी ६ वा. च्या सुमारास जेवण केले. त्यानंतर त्यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वाद झाल्यानंतर रिजवान आणि त्याच्या साथीदाराने अनुजच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून त्याचा खून केला. या प्रकारानंतर ट्रक उड्डाण पूलावर असतांना रिजवान आणि त्याच्या साथीदाने तिथून पळ काढला. सहायक पोलीस निरीक्षक निगडे यांच्या पथकाने पडघा टोल नाका येथील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. यामध्येच या ट्रकमध्ये चालकासह अन्य दोघेजण असल्याचे आढळले. या दोघांमध्ये रिजवान असल्याचे आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार राहूल याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: Truck cleaner arrested for murder of driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.