‘लसीकरण केंद्रावरील टोकन सिस्टम बंद करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:56+5:302021-07-29T04:39:56+5:30
बदलापूर : शहरातील शासकीय लसीकरण केंद्रावरील टोकन सिस्टीममुळे तेथे वशिलेबाजी होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना टोकन मिळत नाही. त्यामुळे ...
बदलापूर : शहरातील शासकीय लसीकरण केंद्रावरील टोकन सिस्टीममुळे तेथे वशिलेबाजी होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना टोकन मिळत नाही. त्यामुळे ही टोकन सिस्टीम बंद करावी आणि प्रथम येणाऱ्या नागरिकाला प्राधान्य देऊन लसीकरण करावे, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवकांची एक बैठक झाली. त्यात लसीकरणासोबत इतर समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी नगरसेवकांनी लसीकरणाबाबत प्रशासनाला अनेक उपाययोजना सुचवल्या. शहरातील शासकीय लसीकरण केंद्रावर काही दिवसांपासून सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. या केंद्रावर नागरिक लस घेण्यासाठी रात्रीपासून रांगा लावत असतात. मात्र, वशिलेबाजीमुळे रात्रीपासून उभ्या असलेल्या सामान्य नागरिकाला लस न घेताच माघारी परतावे लागते. शहरातील अनेक राजकीय पुढारी आपल्या प्रभागांतील नागरिकांना वशिला लावून लस मिळवून देतात. नगरपालिकेने ही टोकन सिस्टीम बंद करावी आणि प्रथम येणाऱ्या नागरिकाला लस द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
-------------