‘लसीकरण केंद्र चालू करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:41 AM2021-04-24T04:41:15+5:302021-04-24T04:41:15+5:30

--------------------------------------------- ‘गतिरोधकावर पट्टे मारावेत’ डोंबिवली : खंबाळपाडा मार्गावर मधल्या परिसरात नुकतेच सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. या ...

'Turn on the vaccination center' | ‘लसीकरण केंद्र चालू करा’

‘लसीकरण केंद्र चालू करा’

Next

---------------------------------------------

‘गतिरोधकावर पट्टे मारावेत’

डोंबिवली : खंबाळपाडा मार्गावर मधल्या परिसरात नुकतेच सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. या मार्गावरील डांबरी रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात आले आहेत. पण, त्यावर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. याठिकाणी पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळेत गतिरोधक दिसून येत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तातडीने पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

---------------------------------------------

स्कूलबॅगा लंपास

कल्याण : एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावात वर्षभर शाळा बंद असताना, दुसरीकडे येथील पूर्वेतील भागात असलेल्या स्कूलबॅग बनविण्याच्या कारखान्यात चोरी झाली आहे. खडेगोळवली परिसरात नौशाद अन्सारी यांचा स्कूलबॅग बनवण्याचा कारखाना आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी याठिकाणी चोरी करून ७२ स्कूलबॅग आणि दोन मशीन असा ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

---------------------------------------------

Web Title: 'Turn on the vaccination center'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.