गारा आणि वाऱ्यासह वळवाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:14 AM2018-04-18T02:14:59+5:302018-04-18T02:14:59+5:30

दुपारी उन्हाचा पारा ४२ अंशांवर असताना सायंकाळी अचानक आभाळ दाटून आले आणि सोसाट्याच्या वाºयासह बदलापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या वळवात काही ठिकाणी गाराही पडल्या.

Turning with hail and wind | गारा आणि वाऱ्यासह वळवाची हजेरी

गारा आणि वाऱ्यासह वळवाची हजेरी

Next

बदलापूर : दुपारी उन्हाचा पारा ४२ अंशांवर असताना सायंकाळी अचानक आभाळ दाटून आले आणि सोसाट्याच्या वाºयासह बदलापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या वळवात काही ठिकाणी गाराही पडल्या. त्याने वातावरणात आल्हाददायक बदल झाला असला, तरी लग्नसराईवर विघ्न आले. कल्याण-डोंबिवलीत पावसाचा फक्त शिडकावा झाला, तर मुरबाडमध्ये पावसाने भाजीपाल्याचे नुकसान झाले.
बदलापुरात अवकाळी पावसाचा कहर तासभर सुरू राहिला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पाणी साचले. गेले दोन दिवस पारा चढलेला होता. बदलापूर-अंबरनाथचा पारा मंगळवारी दुपारी ४२ अंशांवर गेला होता. उकाड्याने, घामाच्या धारांनी सारे हैराण झाले असताना सायंकाळी पाच-साडेपाचच्या दरम्यान सोसाट्याच्या वाºयासह पावसाने हजेरी लावली. या अवेळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. सर्वात मोठी कोंडी झाली ती लग्न समारंभांची. मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस लग्नाचे मुहूर्त असल्याने बदलापुरात अनेक ठिकाणी लग्न समारंभ सुरू होते. त्यासाठी मांडव घातले होते. या पावसाने त्या समारंभातही व्यत्यय आला. पावसामुळे काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस, त्यामुळे झालेली कोंडी यामुळे नागरिक नंतर घराबाहेर पडलेच नाहीत. अपवाद होता, तो परतणाºया चाकरमान्यांचा.
बदलापुरात पावसाने हजेरी लावलेली असताना अंबरनाथमध्ये मात्र नागरिकांना सोसाट्याच्या वाºयाचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्वत्र धूळ पसरली होती. सायंकाळी सहानंतर पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
मुरबाडला भाजीचे नुकसान
मुरबाड : ग्रामीण भागासह मुरबाडच्या शहरी भागात वादळी वाºयांसह आलेल्या अवेळी पावसाने पिकांना झोडपून काढले. पाऊस येण्यापूर्वी दुपारी तीनपासूनच अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पाच ते सहा तासांनंतरही पूर्ववत झाला नव्हता. पावसाने वीटभट्टी मालकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे राष्ट्रीय महामार्गावर किशोर, पोटगाव जवळ मोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस, गावकरी व अग्नीशमन दलाच्या कर्मचाºयांनी तो तोडून बाजूला केले. तालुक्यात ठिकठिकाणी सध्या भेंडी, काकडी, टोमॅटो, पालेभाज्यांची लागवड झालेली होती. त्यांना पावसाने तडाखा दिला.
मुंब्य्रात वीज नऊ तास खंडित
मुंब्रा : वाºयाचा तडाखा बसण्यापूर्वीच मुंब्य्राच्या अनेक भागातील वीजपुरवठा मंगळवारी सकाळी १० ते संध्याकाळी सातदरम्यान म्हणजे सलग नऊ तास खंडित झाला होता. एकीकडे वाढत्या उन्हामुले काहिली आणि त्यात वीज बंदमुळे नागरिक हैराण झाले होते. पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला. तांत्रिक कामे करण्यासाठी वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती महावित्तरणचे कार्यकारी अभियंता पाडुरंग हुंडेकरी यांनी दिली.

डोंबिवलीत आधी धूळधाण, नंतर शिडकावा
प्रचंड उकाड्याने डोंबिवलीकर हैराण झाले असतानाच मंगळवारी संध्याकाळी आधी सोसाट्याच्या वाºयाने हजेरी लावत शहराची धूळधाण उडवून दिली. नंतर अचानक पावसाची जोरदार सर आली आणि नागरिकांवर शिडकावा करून गेली. संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास वाºयामुळे प्रचंड धूळ उडाली.
त्यामुळे रस्ते धुळीने माखले होते. पावसाला सुरु वात झालेली नव्हती, तरीही मातीचा गंध पसरल्याने पावसाची चाहूल लागली होती. तसा तो सहा- सव्वासहाच्या दरम्यान बरसून गेला.
त्यात रस्ते ओलेचिंब झाले. नंतरही आकाश ढगाळलेले होते. पावसाची सर पडून गेल्यानंतरही वातावरणात उष्मा कायम होता. काही काळ ढगांचा गडगडाटही झाला.

वीजपुरवठा खंडित : सोसाट्याचा वारा सुटल्यावर जवळपास संपूर्ण डोंबिवलीतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला होता. मात्र पावसाची सर कोसळून गेल्यावरही जवळपास तीन तासानंतर टप्प्याटप्प्याने तो पूर्ववत झाला. रस्ते काळोखात बुडाले होते. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

व्यापाºयांचा हिरमोड : बुधवारी अक्षय्य तृतीया असल्याने व्यवहारात तेजीची अपेक्षा असतानाच अचानक पडलेल्या पावसामुळे व्यापाºयांचा हिरमोड झाला. रिक्षा आंदोलनावरही त्याचा परिणाम झाला.

लोकलचा खेळखंडोबा
पावसाने लोकलचा वेग मंदावलेला असतानाच आसनगाव लोकलमध्ये तांत्रिक बिघाडाची घटना कल्याणजवळ घडली. कोपर-दिवा मार्गावर लोकल कोंडी झाली होती.

Web Title: Turning with hail and wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस