ठाण्यात घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 08:32 AM2018-03-22T08:32:27+5:302018-03-22T08:32:27+5:30
सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
ठाणे- सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवर ऑइल कंटेनर उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमधील ऑइल रस्त्यावर पसरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. पाटलीपाडा भागात वाघबीळ पुलाजवळ ऑइल कंटेनर उलटल्याची ही घटना घडली आहे. ठाण्याहून बोरिवलीच्या दिशेनं जाणारी एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे बाजूच्या लेनमधून बोरिवलीकडे हळूहळू गाड्या सोडल्या जात आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. कंटेनरचा अपघात झाल्यामुळे रस्त्यावर ऑइल पडले आहे.
सदर घटनास्थळी पोलीस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,अग्निशमन दल, IRB चे कर्मचारी, 2 JCB, 2 मातीचे डंपर दाखल झाले आहेत. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचा-याने रस्त्यावर माती टाकण्याचे काम सुरू केले आहे.जेएनपीटीहून सिल्वासाला जात असताना या ऑइल कंटेनरला अपघात झाला आहे.
या अपघातात कंटेनरचालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीच्या दिशेनं जाणा-या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, उलटलेला कंटेनर हटवण्याचं काम सुरू झालं आहे.