साकिबच्या उपक्रमाची पंचविशी
By admin | Published: April 7, 2016 01:14 AM2016-04-07T01:14:12+5:302016-04-07T01:14:12+5:30
राजकारणात न रमता समाजकारणात रमलेल्या साकिब गोरे यांनी सुरू केलेले मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे गरिबांसाठी नवी दृष्टी देणारे ठरले आहे
बदलापूर : राजकारणात न रमता समाजकारणात रमलेल्या साकिब गोरे यांनी सुरू केलेले मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हे गरिबांसाठी नवी दृष्टी देणारे ठरले आहे. आतापर्यंत ३५ हजार ५५४ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. पुढील पाच वर्षांत हा आकडा ५० हजारांवर नेण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाला गुरुवारी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
आमदार किसन कथोरे यांनी १९९२ मध्ये नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची सुरुवात केली. रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण अधिक असल्यामुळे या मोहिमेची जबाबदारी कथोरे यांनी साकिब यांच्यावर टाकली. या प्रवासाला गुरुवारी आरोग्यदिनी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. खंड न पाडता या शिबिरात अनेकांवर विनामूल्य उपचार केले. अंबरनाथ, मुरबाड, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर या तालुक्यांतून रुग्ण येतात. संपूर्ण तालुक्यात १३९ ठिकाणी केंद्रे उभारून रुग्णांची तपासणी होते. ३५ हजार ५५४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)