श्वानदंशाने अडीचवर्षीय बालक जखमी

By admin | Published: April 25, 2016 03:02 AM2016-04-25T03:02:28+5:302016-04-25T03:02:28+5:30

डोंबिवलीत श्वानदंशाच्या घटना सुरूच आहेत. कृष्णा चौधरी या अडीच वर्षांच्या बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना शनिवारी गांधीनगर परिसरात घडली.

Twenty-two year old boy injured in Shwandas | श्वानदंशाने अडीचवर्षीय बालक जखमी

श्वानदंशाने अडीचवर्षीय बालक जखमी

Next

कल्याण : डोंबिवलीत श्वानदंशाच्या घटना सुरूच आहेत. कृष्णा चौधरी या अडीच वर्षांच्या बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना शनिवारी गांधीनगर परिसरात घडली. बालकावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सातत्याने अशा घटना घडत असल्याने भटक्या श्वानांची दहशत वाढत आहे.
कृष्णा हा गांधीनगर परिसरातील बाबुराव पाटील निवासमध्ये राहतो. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास त्याला श्वानदंश झाला. त्याच्या आजीआजोबांनी नजीकच्या डॉ. आनंद हर्डीकर यांच्या रुग्णालयात नेले होते. तेथे उपचार केल्यावर घरी सोडले.
जानेवारीमध्ये नांदिवली गावातील संकेत म्हात्रे या सात वर्षांच्या मुलाचा श्वानदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, १८ एप्रिलला याच परिसरातील दिव्या जुमडे या लहान मुलीला श्वानदंश झाल्याची घटना घडली होती. जखमी दिव्याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने तिला मुंबईला हलवण्यात आले.
दरम्यान, श्वानदंश आणि त्यावरील औषधांचा मुद्दा नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. शिवसेनेच्या सदस्या प्रेमा म्हात्रे यांनी महापालिकेच्या रुग्णालयात श्वानदंशावर औषधे उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांना जाब विचारला होता. यावर, रेबीज इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु, इमिनोग्लोबीन व्हॅक्सीन महागडे असल्याने ते नसल्याचे स्पष्टीकरण रोडे यांनी दिले होते. जीवापेक्षा औषध महाग नसल्याचे सुनावत सभापती संदीप गायकर यांनी तातडीने संबंधित व्हॅक्सीन खरेदी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Twenty-two year old boy injured in Shwandas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.