ठाण्यात अडीच लाख जिल्हावासीय कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:39+5:302021-02-23T05:00:39+5:30

ठाणे : गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोरोनाने आतापर्यंत दोन लाख ६० हजारांहून ...

Two and a half lakh district corona free in Thane | ठाण्यात अडीच लाख जिल्हावासीय कोरोनामुक्त

ठाण्यात अडीच लाख जिल्हावासीय कोरोनामुक्त

googlenewsNext

ठाणे : गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोरोनाने आतापर्यंत दोन लाख ६० हजारांहून अधिकजण बाधित झाले होते. त्यापैकी दोन लाख ५० हजार २०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कल्याण-डोंबिवलीकरांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात सहा महापालिका आणि दोन नगरपरिषद असून, ग्रामीण भाग आहे. यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत सुरुवातीपासून रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. सुरुवातीला या आजाराने दगावणाऱ्यांची संख्याही जास्त होती. मात्र, ती काही दिवसांनी कमी करण्यात त्या-त्या स्थानिक प्रशासनाला यश आले.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही २ लाख ६० हजार ७२५ इतकी आहे. त्यामध्ये घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ही २ लाख ५० हजार २०० इतकी असून, सहा हजार २३८ जणांचा मृत्यू झाला आहे; तर आजघडीला चार हजार २८७ जण कोरोनाबाधित आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात मागील १० ते १५ दिवसांपासून जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.

.........................

तक्ता :-

क्षेत्र-रुग्णसंख्या-बरे होणारे रुग्ण-मृत्यू

ठामपा ६१०७० -५८५२९ -१३८०

केडीएमसी ६१९८३ -५९६७७ - ११८९

नवी मुंबई ५४५८६ -५२४२६ -१११०

उल्हासनगर ११७५१ -५ ११२९८ -०३७१

मीरा-भाईंदर २६७८६ -२५५६१ - ०८०२

भिवंडी ०६७५७ -०६३७६ -०३५४

अंबरनाथ ०८७०१ - ०८३१३ - ०३१५

बदलापूर ०९६८३ - ०९४०४ -०१२५

ठाणे ग्रामीण १९४०८ - १८६७२ -०५९२

--

Web Title: Two and a half lakh district corona free in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.