दिवा रेल्वे फाटकावर दोन शस्त्रधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:11 AM2018-06-20T03:11:10+5:302018-06-20T03:11:10+5:30
दिव्यातील रेल्वे फाटकावर सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने त्या फाटकाच्या दोन्ही बाजूला मंगळवारी प्रत्येकी दोन शस्त्रधारी रेल्वे पोलीस तैनात केले आहेत.
ठाणे : दिव्यातील रेल्वे फाटकावर सोमवारी झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने त्या फाटकाच्या दोन्ही बाजूला मंगळवारी प्रत्येकी दोन शस्त्रधारी रेल्वे पोलीस तैनात केले आहेत. यावेळी फाटक बंद असताना वाहन घेऊन शिरकाव करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून तिघांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये दोन मोटारसायकल व एका सायकलस्वाराचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई अशी सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
कमी भाडे असो या स्वस्तात विक त मिळणाºया घरांमुळे मागील चार-पाच वर्षात दिवा गावाचे नागरिकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात उतरल्यावर गावात जाण्यासाठी एकच प्रमुख मार्ग असल्याने दिवसभरात कधीही पाहिले तरी लोंढेचे लोंढे जाताना दिसतात. त्यामुळे दिवा रेल्वे सुरक्षाबल अंतर्गत येणाºया दिवा रेल्वे फाटक हे सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण झाले आहे. रूळ ओलांडताना अपघात होणे नित्याची बाब आहे. त्यातच सोमवारी एक्स्प्रेसने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. फाटक बंद असताना, दादागिरी करून वाहने किंवा पायी जाणाºयांची संख्या आणि सोमवारच्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन शस्त्रधारी पोलीस तैनात के ले आहेत.
>अंदाज न आल्याने अपघात ?
फाटक बंद झाल्यानंतरही गावकरी वाहने रूळावर घेऊन उभे राहतात. पण, सोमवारी झालेल्या अपघातात ते दोघे स्थानिक नसल्याने त्यांचा अंदाज चुकला आणि हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या मागे असलेल्या स्थानिकाने जाणाºया गाडीचा अंदाज घेऊन थांबणे पसंत केले होते, असे सूत्रांनी सांगितले.
सीसीटीव्हीद्वारेही निगराणी : शस्त्रधारी पोलीस तैनात केले असले तरी, रेल्वे स्थानकात होणाºया बारीक-सारीक गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी ४८ सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे निगराणी ठेवली जात आहे. सद्यस्थितीत सर्व सीसीटिव्ही कॅमेरे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्थानिक संघटना-पुढाºयांची मदत : स्थानिक नागरिकांची प्रत्येक ठिकाणी दादागिरी असते. तशीच दादागिरी दिव्यातही आहे. त्यामुळे रेल्वे फाटक लावल्यावर दादागिरी करण्यांना पाठीशी घालू नये. यासाठी रेल्वे पोलिसांनी प्रवासी,व्यापारी आणि स्थानिक पुढाºयांनी पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पोलिसांना पाठिंबा दर्शवला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेटमॅनला मारहाण : या फाटकावर तैनात असलेल्या गेटमॅनने गावकºयांना विरोध केल्यास शिवीगाळ करणे ही गोष्ट नेहमीची झाली आहे. त्यातच, काही गेटमॅनाना मारहाण झाली आहे.पाच -सहा महिन्यांपूर्वी मारहाणीचा प्रकार झाल्याचा सुर आता दबक्या आवाजात उमटत आहे. मात्र अशाप्रकारे गेटमॅनला मारहाण करुन पुढे जाणे जीवावर बेतणारे आहे.