आॅनलाईन लॅपटॉप खरेदीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 09:44 PM2021-02-10T21:44:17+5:302021-02-10T21:47:42+5:30

एका खासगी संकेतस्थळावरुन लॅपटॉप खरेदीच्या बहाण्याने ठाण्यातील एका ५२ वर्षीय रहिवाशाची फसवणूक करणाºया पिटर उर्फ रॉईस जॉश सॅन्चेस (३०) आणि सिध्देश सावंत (३०) या दोन भामटयांना कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

Two arrested for cheating under the pretext of buying laptops online | आॅनलाईन लॅपटॉप खरेदीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

कासारवडवली पोलिसांची कामगिरी

Next
ठळक मुद्दे दोन लाख ३० हजारांचा लॅपटॉप हस्तगत कासारवडवली पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एका खासगी संकेतस्थळावरुन लॅपटॉप खरेदीच्या बहाण्याने ठाण्यातील एका ५२ वर्षीय रहिवाशाची फसवणूक करणाºया पिटर उर्फ रॉईस जॉश सॅन्चेस (३०) आणि सिध्देश सावंत (३०) या दोन भामटयांना कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख ३० हजारांचा लॅपटॉप हस्तगत केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी बुधवारी दिली.
ठाण्यातील कासारवडवली येथील रहिवाशी श्रीधर हेगडे (५२) यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याने तसेच त्याला लॅपटॉपची आवश्यकता नसल्याने त्याने दोन लाख ३० हजारांच्या लॅपटॉप विक्रीची जाहिरात एका खासगी संकेतस्थळावर दिली होती. हीच जाहिरात पाहून पिटर आणि सावंत या दोघांनी हेगडे यांच्या मुलाशी संपर्क साधून ते लॅपटॉप पाहण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी लॅपटॉप ताब्यात घेऊन सोबत दोन लाख ३० हजारांचा धनादेश आणला. तो वटविण्यासाठी त्यांनी हेगडे यांच्या मुलाला अ‍ॅक्सिस बँकेत पाठविले. बँकेत त्याने चौकशी केली असता, हा धनादेश एका सॉफ्टवेअर कंपनीच्या बंद केलेल्या बँक खात्याचा असल्याचे आढळले. धनादेश वटणार नाही, म्हणून बँकेतून तो बाहेर आला. तोपर्यंत या भामटयांनी लॅपटॉप घेऊन पलायन केले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हेगडे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात ७ फेबु्रवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल केला. याच तक्रारीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सहदेव पालवे यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पिटर याला मालवणी, मुंबईतून तर त्याचा दुसरा साथीदार सावंत याला अंधेरी येथून ८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. कसून चौकशीमध्ये या दोघांनीही हेगडे यांचा लॅपटॉप मुंबईतील लँमिग्टन रोड येथे विक्री केल्याची कबूली दिली. ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विक्र ी केलेल्या ठिकाणी जाऊन या पथकाने हा लॅपटॉप हस्तगत केला. दोघांनाही ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आरोपींनी अशा पदधतीचे अ‍ॅक्सिस बँकेचे बनावट धनादेश देऊन ओएलक्स च्या माध्यमातून आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Two arrested for cheating under the pretext of buying laptops online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.