ठार मारण्याची धमकी देत बांधकाम व्यावसायिकाकडून दहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 07:22 PM2021-11-04T19:22:19+5:302021-11-04T19:24:14+5:30

बदलापूर येथील बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी देत, त्याला मारहाण करुन त्याच्याकडून दहा लाख ८९ हजारांची खंडणी उकळणाºया कल्पेश जाधव (२६) आणि दीपक संदनशिव (३३, रा. दोघेही बदलापूर) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली.

Two arrested for extorting Rs 10 lakh from builder | ठार मारण्याची धमकी देत बांधकाम व्यावसायिकाकडून दहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक

ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Next
ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईदोन वर्षांपासून सुरु होता प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बदलापूर येथील बांधकाम व्यावसायिकासह त्याच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी देत, त्याला मारहाण करुन त्याच्याकडून दहा लाख ८९ हजारांची खंडणी उकळणाºया कल्पेश जाधव (२६) आणि दीपक संदनशिव (३३, रा. दोघेही बदलापूर) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
बदलापूर पूर्व भागातील प्रकाशकुमार जयस्वाल (३८) या बांधकाम व्यावसायिकाला २६ जून २०१९ ते १८ आॅक्टोंबर २०२१ या काळात बदलापूरातील मच्छी मार्केट जवळील पे अ‍ॅन्ड पार्क परिसरात तसेच इतरत्र हा प्रकार सुरु होता. कल्पेश, दीपक तसेच त्यांच्या इतर आणखी तीन ते चार साथीदारांनी आपसात संगनमत करुन जयस्वाल यांना रस्त्यात अडवून त्यांना तसेच त्यांच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करीत त्यांच्याकडून काही रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा दहा लाख ८९ हजारांचा ऐवज जबरीने काढून घेतला. ही कैफियत जयस्वाल यांनी ठाणे गुन्वेषण विभागाकडे मांडल्यानंतर याप्रकरणी २ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात खंडणी उकळणे, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. याची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी हे प्रकरण खंडणी विरोधी पथकाकडे सोपविले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे आणि सुधाकर हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. नाळे यांच्या पथकाने ३ नोव्हेंबर रोजी कल्पेश आणि दीपक या दोघांना बदलापूरातून अटक केली. त्यांच्या इतरही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two arrested for extorting Rs 10 lakh from builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.