डान्स शो व मोठ्या इव्हेंटमधील तरुणींना वेश्या व्यवसायस लावणाऱ्या दोघांना अटक, ६ तरुणींची सुटका
By धीरज परब | Published: July 24, 2023 09:10 PM2023-07-24T21:10:08+5:302023-07-24T21:10:18+5:30
पोलिसांनी ६ तरुणींची सुटका केली आहे.
मीरारोड - डान्स शो व मोठ्या इव्हेंट मधील तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास लावणाऱ्या दलाल महिलेस तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ६ तरुणींची सुटका केली आहे.
मीरा भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक समीर अहिराव याना माहिती मिळाली कि , नंदिनी शंकर वडारी ( ३३ ) रा . दसरा मैदान चाळ , रामायण नगर , उल्हासनगर हि महिला तिची तृतीयपंथी साथीदार पूनम उर्फ अन्नू ( ३५ ) रा . उल्हासनगर सोबत व्हॉट्सऍप द्वारे ग्राहकांना डान्स शो व इव्हेन्ट मॅनेजमेंट मधील मॉडेल तरुणींना वेश्याव्यवसाय साठी पाठवते . नंदिनी हि मुंबई , ठाणे , पुणे , लोणावळा , महाबळेश्वर, इगतपुरी , कर्जत सह गुजरात , गोवा , दमण भागात गाडीने तरुणींना ग्राहकाला पुरवते असे समजले .
अहिरराव यांनी बोगस गिर्हाईक मार्फत नंदिनीशी संपर्क केला असता तिने २५ हजारांच्या मोबदल्यात डान्स शो मधील मॉडेल तरुणी देण्याचे नक्की केली. अहिररराव यांनी विजय निलंगे ,रामचंद्र पाटील , उमेश पाटील , केशव शिंदे , चेतनसिंह राजपूत , शीतल जाधव , सम्राट गावडे , अश्विनी वाघमारे अश्या पोलीस पथकासह भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे , महिला हवालदार बी . के . देशमुख यांना बोलावून वरसावे नाकाच्या फाऊंटन हॉटेल जवळ सापळा रचला.
नंदिनी हि तिच्या गाडीतून ६ तरुणींना फाउंटन येथे घेऊन आली. बोगस गिऱ्हाईकला गाडीतील तरुणी दाखवून एकीसाठी त्याच्या कडून २५ हजार घेतले. लागलीच पोलिसांनी धाड टाकून नंदिनी सह गाडीचा चालक राजेश उर्फ विकी रामचंद्र (३८) तेजूमल चक्की रोड , उल्हासनगर १ नागदेव ह्या दोघांना पकडले . पीडित ६ तरुणींची चौकशी करून त्यांना सुधारगृहात पाठवले आहे . काशीमीरा पोलीस ठाण्यात पिटा चा गुन्हा दाखल करत नंदिनी व राजेश ला त्यांच्या ताब्यात दिले आहे . तर तृतीयपंथी पूनमचा शोध सुरु आहे. नंदिनी हि ब्युटी पार्लर चालवत असून डान्स शो व स्टेज शो करताना तिची पूनम सोबत ओळख झाली होती . ४ वर्षां पासून ती हा धंदा चालवत होती .