ठाण्यात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Published: March 29, 2023 07:45 PM2023-03-29T19:45:44+5:302023-03-29T19:45:50+5:30
दोन मुलींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
ठाणे: ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणाºया एका दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी दिली. या धाडीनंतर दोन पीडित मुलींची सुटकाही करण्यात आली आहे.
ठाणे पश्चिमेकडील कापूरबावडी जंक्शन येथील महादेव हॉटेलच्या परिसरात ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविला जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २८ मार्च रोजी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून या प्रकाराचा भंडाफोड केला. यात एका दलालाला अटक करण्यात आली आहे.
हा दलाल त्याच्या अन्य तीन साथीदारांसह गेल्या चार ते पाच वर्षांपासून ठाणे, मीरा रोड, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील ग्राहकांना ऑनलाईन तसेच मोबाईलवरील व्हॉटसअॅपद्वारे पीडित मुलींचे फोटो पाठवित होता. त्यानंतर अशा ग्राहकांना आकृष्ट करुन पैशांचे अमिषाने गरजू मुलींना त्यांच्याकडे शरीरविक्रयासाठी पाठवित होता. हाच प्रकार उघड केल्यानंतर याप्रकरणी दलालासह चौघांविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.