भिवंडीत कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
By नितीन पंडित | Published: March 12, 2024 05:36 PM2024-03-12T17:36:51+5:302024-03-12T17:37:23+5:30
खाद्यपदार्थांची विल्हेवाट न लावता सदर खाद्यपदार्थ विक्री करत असताना आढळून आल्याने याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी दोघांना सोमवारी अटक केली आहे.
भिवंडी: झोमॅटो कंपनीची कालबाह्य झालेले खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी दोन इसमांना दिली असता सदर इसमांनी खाद्यपदार्थांची विल्हेवाट न लावता सदर खाद्यपदार्थ विक्री करत असताना आढळून आल्याने याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी दोघांना सोमवारी अटक केली आहे.
मोहम्मद अहमद मोहरम अली कुरेशी वय ४२ वर्ष रा. खंडूपाडा रोड व असीम अक्रम अन्सारी वय ३१ वर्ष रा. खान कंपाऊंड भिवंडी असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांना झोमॅटो कंपनीने कालबाह्य झालेली ५७ हजार तीनशे रुपयांचे खाद्यपदार्थ विल्हेवाट लावण्यासाठी मोहम्मद अहमद व असीम अक्रम याकडे सोपविली होती. मात्र या दोघांनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी मुदतबाह्य मालाची विल्हेवाट न लावता ते विक्री करत होते. सदर बाब शांतीनगर पोलिसांच्या निदर्शनात येतात पोलिसांनी मोहम्मद अहमद मोहरम अली कुरेशी व त्याचा कामगार असीम अक्रम अन्सारी या दोघांना अटक केली आहे.