भिवंडीत बनावट एव्हरेस्ट व मॅगी मसाला विक्री करणाऱ्या दोघांना अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त
By नितीन पंडित | Published: May 24, 2024 03:07 PM2024-05-24T15:07:22+5:302024-05-24T15:08:10+5:30
रस्त्यावर सापळा कारवाई करीत त्या ठिकाणी जोगेश्वरी येथून संशयित टेम्पो आला असता त्यास थांबवून त्याची तपासणी केलीरस्त्यावर सापळा कारवाई करीत त्या ठिकाणी जोगेश्वरी येथून संशयित टेम्पो आला असता त्यास थांबवून त्याची तपासणी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा शांतीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून १ लाख ८ हजार रुपये किमतीचा बनावट मसाल्याचे पाकीट जप्त करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भिवंडी शहरात एका टेम्पो मधून बनावट पॅकिंग केलेला एव्हरेस्ट मसाला विक्री साठी येणार असल्याची गुप्त माहिती शांतीनगर शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना समजली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांसह पोलीस निरिक्षक (प्रशा) विनोद पाटील,पोलीस निरिक्षक (गुन्हे) अतुल अड्डुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे,संतोष पवार, श्रीकांत पाटील, पोना,किरण जाधव, नरसिंह क्षीरसागर,रोशन जाधव,रविंद्र पाटील,तौफिक शिकलगार यांनी जब्बार कंपाऊंड शांतीनगर या रस्त्यावर सापळा कारवाई करीत त्या ठिकाणी जोगेश्वरी येथून संशयित टेम्पो आला असता त्यास थांबवून त्याची तपासणी केली .त्यामध्ये १ लाख ८ हजार रुपये किमतीचे एव्हरेस्ट चिकन मसाला,एव्हरेस्ट मटण मसाला व मॅगी मसाल्याचा बनावट मालाचे पॅकेट आढळून आले.
टेम्पो चालक महेश लालताप्रसाद यादव व माल विक्री साठी आलेला मोहमद सलमान मोहमद अफजल प्रधान दोघे रा. जोगेश्वरी यांना ताब्यात घेतले असता चौकशी मध्ये हा बनावट माल गुजरात राज्यातील सुरत येथील फॅक्टरी मध्ये बनवून महाराष्ट्रासह गुजरात,मध्या प्रदेश,उत्तर प्रदेश या राज्यांत विक्री केला जात असल्याचे समजल्याने पोलिस पथकाने सुरत येथील ईश्वरनगर सोसायटी, पर्वतगाव येथे छापा टाकला असता तेथे करण सुरेशभाई मेवाडा हा बनावट मसाला तयार करीत असल्याचे आढळून आल्याने पोलिस पथकाने तेथील कच्चा माल व मशीन व फॅक्टरी सिल करून कारवाई केली आहे.
खऱ्या एव्हरेस्ट मसाले पाकिटावर ई हॉलमार्क असतो परंतु बनावट पाकिटावर असा हॉलमार्क आढळून आला नाही.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट करीत एव्हरेस्ट कंपनीचे सेल्समन सचिन काशीनाथ पासलकर यांच्या तक्रारी वरून या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांनी सुध्दा आपण वापरीत असलेले पॅक बंद खाद्य पदार्थ खरेदी करीत असताना त्याच्या खरे पणाची खात्री करून घ्यावी तसेच अशा कंपनीनी सुध्दा मालाची सत्यता ग्राहकांना ओळखता यावी या साठी जनजागृती करण्याची गरज असल्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी केले आहे.