अंबरनाथमध्ये दागिने चोरी करणाऱ्या बंटी बबलीला अटक
By पंकज पाटील | Published: December 20, 2023 07:29 PM2023-12-20T19:29:22+5:302023-12-20T19:30:48+5:30
अंबरनाथ पोलिसांनी नाशिक मधून ठोकल्या बेड्या.
पंकज पाटील, अंबरनाथ:अंबरनाथमध्ये लहान मुलाला बघण्याच्या बहानाने दागिने चोरणाऱ्या बंटी बबलीला अंबरनाथ पोलिसांनी नाशिक मधून अटक केली आहे. अंबरनाथ पश्चिम न्यू वडवली परिसरातील थारवानी आरयानी नावाची इमारत आहे या इमारती मध्ये मोनिका रोहित निकम हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ९ डिसेंबरला रोहित निकम यांचे मित्र शारिष कांबळे आणि दीपाली मांजुरे हे रोहितच्या लहान मुलाला बघण्यासाठी पाहुणे म्हणून आले होते.
मात्र घरातील अंदाज घेत कपाटात ठेवलेले तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त सोन्याचे दागिने चोरून कोणाला न सांगता नाशिकला पळून गेले. त्यानंतर रोहितच्या पत्नी मोनिका यांनी कपाटात ठेवलेली दागिनेची पर्स त्यांना सापडली नाही. आपल्या घरी रोहितच्या मित्र शिवाय कोणी आलं नाही त्यामुळे त्यांनी संशय घेत अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शारिष कांबळे आणि दीपाली मांजुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यातील संदीप भालेराव यांच्या पथकाने नाशिक मध्ये दाखल होत बंटी बबलीला अटक करत अंबरनाथ पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केल्या असता त्यांनी या चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 36 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आज बंटी बबलीला न्यायालयात हजर केल असता न्यायालयाने 2 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास अंबरनाथ पश्चिम पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक शिंदे यांनी दिले आहे.