हवालदारास मारहाण करणा-या दोघांना अटक, आरोपी अल्पवयीन, रवानगी बालसुधारगृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:23 AM2018-02-11T02:23:21+5:302018-02-11T02:23:27+5:30

वाहनतळात डबल पार्र्किं ग केलेल्या कारला जॅमर लावून फोटो काढणारे कासारवडवली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार महेश यादव यांना मादक पदार्थाचे सेवन केलेल्या दुकलीने मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दुकलीला अटक केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.

Two arrested for harassing the attacker, accused minor, sent to child rearing house | हवालदारास मारहाण करणा-या दोघांना अटक, आरोपी अल्पवयीन, रवानगी बालसुधारगृहात

हवालदारास मारहाण करणा-या दोघांना अटक, आरोपी अल्पवयीन, रवानगी बालसुधारगृहात

Next

ठाणे : वाहनतळात डबल पार्र्किं ग केलेल्या कारला जॅमर लावून फोटो काढणारे कासारवडवली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार महेश यादव यांना मादक पदार्थाचे सेवन केलेल्या दुकलीने मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या दुकलीला अटक केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.
पोलीस हवालदार यादव हे शुक्रवारी दुपारी हिरानंदानी मिडोज या परिसरातील रिव्हीएरा हॉटेल येथे टोर्इंग व्हॅनद्वारे कारवाई करत होते. याचदरम्यान, डबल पार्किंग केलेली कार काढण्यास सांगितले. त्यावेळी कारमध्ये बसलेल्या खोपट येथील अल्पवयीन असलेला एक १६ वर्षाच्या मुलगा आणि श्रीरंग सोसायटीतील अक्षय मोरे (२१) या दोघांनी कार काढण्यास नकार दिला. कार काढत नसल्याने यादव हे कारवाई करण्यासाठी जॅमर लावून फोटो काढताना, दोघांनी त्यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी यादव यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करून त्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्या दोघांनी मादक पदार्थाचे सेवन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर अल्पवयीन मुलाची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली असून अक्षय मोरे याला न्यायालयात हजर केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.

Web Title: Two arrested for harassing the attacker, accused minor, sent to child rearing house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा