ठाण्यातील गणेश मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:17 PM2020-12-04T17:17:36+5:302020-12-04T17:20:56+5:30
सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड चोरणाºया अजय जयस्वार (२२, रा. मानपाडा, ठाणे) आणि सलमान खान (२०, रा. मानपाडा, ठाणे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मानपाडा येथील सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड चोरणाºया अजय जयस्वार (२२, रा. मानपाडा, ठाणे) आणि सलमान खान (२०, रा. मानपाडा, ठाणे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
मानपाडा भागात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर कापूरबावडी पोलिसांची ३ डिसेंबर रोजी पहाटे २.५० वाजण्याच्या सुमारास गणेशनगर येथील गणेश रोडवर पेट्रोलिंग सुरु होती. त्यावेळी दोघेजण मंदिराच्या बाहेरुन संशयास्पदरित्या जातांना आढळले. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. मांढरे, पोलीस हवालदार एस. एल. खोडे, पोलीस नाईक सी. डी. शिंदे, आर. एस. राठोड, एस. ए. काळे आणि पोलीस कॉन्स्टेबल एस. बी. चव्हाण आदींच्या पथकाने त्यांची झडती घेतली. त्यावेळी मंदिरातील दानपेटीचे कुलूप उचकटून दानपेटीतील रोख रक्कम चोरल्याची त्यांनी कबूली दिली. त्यांच्याकडून ६४५ रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यांनी तिजोरी फोडण्यासाठी कोणती हत्यारे वापरली? दानपेटीतील आणखी नेमकी किती रक्कम चोरली? त्याचबरोबर परिसरात त्यांनी आणखी चोºया केल्या आहेत का? याबाबतच्या चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कापूरबावडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.