झोपडे तोडण्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:25+5:302021-08-28T04:44:25+5:30
ठाणे : झोपडे तोडण्याची धमकी देत सुशीला वाघमारे या ६५ वर्षीय वृद्धेकडून चार हजारांची खंडणी उकळणाऱ्या मुकुंद वाघमारे (३५) ...
ठाणे : झोपडे तोडण्याची धमकी देत सुशीला वाघमारे या ६५ वर्षीय वृद्धेकडून चार हजारांची खंडणी उकळणाऱ्या मुकुंद वाघमारे (३५) आणि किसन पाईकराव (३५) या दोघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
घोडबंदर रोड, तुर्कीपाडा येथील रहिवासी असलेले राजाभाऊ चव्हाण (४५, रा. वर्तकनगर, ठाणे), किसन पाईकराव, मुकुंद वाघमारे आणि प्रकाश मगरे यांनी आपसात संगनमत करून २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सुशीला यांना त्यांची राहती झोपडी तोडण्याची धमकी दिली. ही झोपडी तोडायची नसेल तर चार हजारांच्या खंडणीची मागणी केली. सुशीला यांनी २५ ऑगस्ट रोजी या चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सी. के. सपकाळे यांच्या पथकाने मुकुंद आणि किसन या दोघांना अटक केली. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
..........
वाचली.