भिवंडीत दोन बांगलादेशी नागरिकांची धरपकड
By नितीन पंडित | Published: August 17, 2023 04:44 PM2023-08-17T16:44:25+5:302023-08-17T16:45:15+5:30
भिवंडी शहरात मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार मजूर वास्तव्यास आहेत.त्याचाच गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक आपली ओळख लपवून शहरात वास्तव्य करीत असतात.
भिवंडी शहरात मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार मजूर वास्तव्यास आहेत.त्याचाच गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक आपली ओळख लपवून शहरात वास्तव्य करीत असतात.अशाच प्रकारे अवैध वास्तव्य करणाऱ्या दोघा बांगलादेशी नागरिकांची ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने धरपकड केली आहे.शौकत अबुलकलाम शेख, वय ३०,धंदा प्लंबर,अबीर मुस्लिम शेख,वय २६,धंदा बिगारी,दोघे रा.विठठ्लनगर,रतन सिनेमा जवळ अशी अटक बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे बांगलादेशी नागरीक असून ते कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून भिवंडी परिसरात २०१८ पासून अवैधरित्या वास्तव्य करीत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथका च्या ठाणे युनिटला मिळाली होती.त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक श्रेयन बाबुराव राठोड यांच्या पथकाने ही धरपकड कारवाई केली.व त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल,बँक डेबिट कार्ड, पॅनकार्ड,आधारकार्ड, जन्म प्रमाणपत्र जप्त करण्यात आले आहेत.बुधवारी या दोघांना स्थानिक नारपोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.त्या ठिकाणी शौकत अबुलकलाम शेख,अबीर मुस्लिम शेख या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.