भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशींना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Updated: December 19, 2024 21:48 IST2024-12-19T21:47:12+5:302024-12-19T21:48:04+5:30
Thane News: डोंबिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका महिलेसह दोन बांग्लादेशी नागरिकांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशींना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
- जितेंद्र कालेकर
ठाणे - डोंबिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका महिलेसह दोन बांग्लादेशी नागरिकांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध पारपत्र कायद्यासह भारतीय न्याय संहिता कायद्याखाली गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीतील पिसवली गावामध्ये दोन बांग्लादेशी वास्तव्य करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पिसवली गावातील एका इमारतीमध्ये छापा टाकून भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेल्या पासपोर्ट आणि विजा शिवाय वास्तव्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून ते या भागात वास्तव्य करीत होते. त्यांच्याकडे बाग्लादेशाचा जन्म दाखला, चालक परवाना, राष्ट्रीय ओळखपत्र आणि बँक पासबुकही मिळाले. पिसवली गावात ते भाडयाने खोली घेऊन वास्तव्य करीत होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पारपत्र कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.