शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 14, 2024 10:57 PM2024-09-14T22:57:05+5:302024-09-14T22:59:10+5:30

निखिल बुडजडे आणि नितीन पाटोळे अशी या शाखाप्रमुखांची नावे आहेत.  

Two branch chiefs of the shiv sena Shinde group were expelled from their posts in thane | शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य

शिंदे गटाच्या दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी, केलं होतं असं कृत्य


ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात ढोल ताशा वादकांवर पैसे उडवणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन शाखाप्रमुखांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. निखिल बुडजडे आणि नितीन पाटोळे अशी या शाखाप्रमुखांची नावे आहेत.

शिवसेना शिंदें गटाची कारवाई -
गणपती विसर्जनाच्या रात्री आपल्याकडून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये जे कृत्य घडले, ते अतिशय निंदनीय असून त्यामुळे आपल्या पक्षावर चौफेर बाजूने टीका होत आहे. सदर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. तरी या कारणास्तव आपल्याला पदावरून काढून टाकण्यात येत आहे. तरी सदर घडलेल्या प्रकरणाबाबत आपण दोन दिवसात खुलासा करावा, असा उल्लेख यासंदर्भात काढण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे.

Web Title: Two branch chiefs of the shiv sena Shinde group were expelled from their posts in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.