दोघा लाचखोरांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:48 AM2021-09-09T04:48:23+5:302021-09-09T04:48:23+5:30
कल्याण : वर्कऑर्डर काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज आणि खासगी प्लंबर ...
कल्याण : वर्कऑर्डर काढण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील वाळंज आणि खासगी प्लंबर रवींद्र डायरे यांना मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
केडीएमसीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची लाचेची हाव कमी होत नसल्याचे विविध घटनांमधून वारंवार उघडकीस येत आहे. मंगळवारी पुन्हा त्याची प्रचिती आली. लाचखोरीच्या प्रकरणांमुळे केडीएमसीतील भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट होत असताना संबंधितांवर कठोर कारवाई अपेक्षित आहे. परंतु, सरकारी निर्णय लाचखोरांच्या हिताचे ठरत असल्याने लाचप्रकरणी होत असलेल्या कारवाईचे भय राहिलेले नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून अधोरेखित होत आहे. आतापर्यंत मनपाच्या इतिहासात ४५ हून अधिक अधिकारी व कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांत अटक झाले आहेत. लाच घेण्याची लागलेली ‘लत’ जर थांबली नाही तर लवकरच लाचखोरीचे अर्धशतक गाठले जाईल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
-------------