दोघा भावांचा नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:03 AM2020-09-01T03:03:20+5:302020-09-01T03:03:41+5:30
शहरातील मिल्लतनगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमध्ये राहणारे हे भाऊ शनिवारी सायंकाळी आईसह नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीकाठावर उभा असलेला एक भाऊ पाय घसरून नदीत पडला.
भिवंडी : गळ टाकून कामवारी नदीत मासे पकडण्यासाठी काठावर बसलेला एक भाऊ पाय घसरून नदीत पडून बुडाला. तर, दुसरा भाऊ त्याला वाचविण्यासाठी गेला असताना तोही बुडाला. दोघेही सख्खे भाऊ बुडून मरण पावल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. शाहबाज अन्सारी (२४) व शाह आलम अन्सारी (२२) अशी मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
शहरातील मिल्लतनगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमध्ये राहणारे हे भाऊ शनिवारी सायंकाळी आईसह नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी नदीकाठावर उभा असलेला एक भाऊ पाय घसरून नदीत पडला. त्यामुळे दुसरा भाऊ आईची ओढणी घेऊन त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, तोही बुडू लागला. त्यामुळे आईने मदतीसाठी याचना केली. ही माहिती मिळताच उपमहापौर इम्रान वली मो. खान यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले. तरुणांनी नदीत शोध घेत सायंकाळी शाह याचा मृतदेह बाहेर काढला. तर, शाहबाजचा मृतदेह शोधण्यात अंधारामुळे अडचणी आल्या. त्यामुळे रविवारी शोध घेतला असता तो सकाळी सापडला.