उल्हासनगराच्या खुनी राजकारणात दोन भाऊ गमाविले - मीना आयलानी
By सदानंद नाईक | Updated: November 8, 2024 21:48 IST2024-11-08T21:47:35+5:302024-11-08T21:48:01+5:30
उल्हासनगर महापालिकेच्या टाऊन हॉल मध्ये शुक्रवारी व्यापारी संघटनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

उल्हासनगराच्या खुनी राजकारणात दोन भाऊ गमाविले - मीना आयलानी
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील खुनी राजकारणात माझे दोन भाऊ गमाविल्याची खंत माजी महापौर मीना आयलानी यांनी टाऊन हॉल मध्ये आयोजित केलेल्या व्यापारी संघटनेच्या कार्यक्रमात व्यक्त केली. यावेळी श्रीकांत शिंदे, कुमार आयलानी, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह अन्य नेते उपस्थिती होते.
उल्हासनगर महापालिकेच्या टाऊन हॉल मध्ये शुक्रवारी व्यापारी संघटनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला व कुमार आयलानी यांना पाठिंबा देण्यासाठी प्रथमच श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी आयलानी यांच्या धर्मपत्नी व माजी महापौर मीना आयलानी यांनी शहरातील खुनी राजकारणात माझे सक्के दोन भाऊ गमाविल्याची खंत व्यक्त केली. शहराला पुन्हा खुनी राजकारणापासून वाचवायला हवे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात महायुती सरकार यशस्वी झाल्याची माहिती कुमार आयलानी यांनी दिली. श्रीकांत शिंदे यांनी आयलानी यांच्या सोबत शिंदेसेना खांद्याला खांदा लावून प्रचार करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी व्यापाऱ्यांचे समस्या त्यांनी एकूण घेतल्या.
शहर व्यापाऱ्यांच्या कार्यक्रमाला शिंदेसेनेचे नेते श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, राष्ट्रवादी महाराष्ट्र समन्वयक प्रमोद हिंदुराव, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपचे नेते नरेंद्र राजांनी, जमनू पुरस्वानी, महेश सुखरामनी, मनोहर खेमचंदानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपक छतलांनी, जगदीश तेजवाणी, माजी नगरसेवक राजू जग्यासी, लाल पंजाबी, नरेश ठारवानी यांच्यासह रिपाई व पीआरपीचे पदाधिकारी उपस्थित होते.