शॉक लागून दोन म्हशींचा मृत्यू, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावीची मागणी
By प्रशांत माने | Published: July 2, 2023 09:00 PM2023-07-02T21:00:27+5:302023-07-02T21:00:37+5:30
डोंबिवली : येथील पश्चिमेकडील बावनचाळ रेल्वे ग्राऊंड परिसरात रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास दोन म्हशी मृतावस्थेत आढळून आल्या. त्याच्या बाजूला ...
डोंबिवली: येथील पश्चिमेकडील बावनचाळ रेल्वे ग्राऊंड परिसरात रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास दोन म्हशी मृतावस्थेत आढळून आल्या. त्याच्या बाजूला विद्युत डीपी बॉक्स असल्याने त्यांचा मृत्यू शॉक लागून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याठिकाणी आणखीन एक म्हैस निपचित पडली होती.
याची माहिती अग्निशमन दलाला नागरिकांनी कळवताच ह प्रभागातील संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेत तीला सुखरूप बाहेर काढले. त्याठिकाणी कचरा तसेच पाणी असल्याने म्हशी त्याठिकाणी गेल्या असाव्यात आणि त्यांना शॉक लागला असावा असे बोलले जात आहे. दरम्यान याप्रकरणी महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांवर कारवाई करावी अशी मागणी म्हशींचे मालक आशिष दळवी यांनी केली आहे.