लॉटरीच्या आड जुगार चालवणाऱ्या दोघांना भाईंदर मध्ये पकडलं

By धीरज परब | Published: March 28, 2023 05:00 PM2023-03-28T17:00:48+5:302023-03-28T17:02:01+5:30

त्याठिकाणी लोटस ऑनलाईन लॉटरी व झटपट लॉटरी नावाने बेकायदेशीर जुगार खेळवला जात होता . 

Two caught gambling under the guise of lottery in Bhayander | लॉटरीच्या आड जुगार चालवणाऱ्या दोघांना भाईंदर मध्ये पकडलं

लॉटरीच्या आड जुगार चालवणाऱ्या दोघांना भाईंदर मध्ये पकडलं

googlenewsNext

मीरारोड - भाईंदर पूर्वेस रेल्वे स्थानका समोरील रेल व्हू इमारतीच्या गाळ्यात लोटस ऑनलाईन लॉटरी आणि झटपट लॉटरी नावाने जुगार चालवला जात असल्या प्रकरणी नवघर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले . 

सदर इमारतीच्या गाळ्यात लॉटरीच्या नावाखाली जुगार चालवला जात असल्याची माहिती उपनिरीक्षक युवराज चौधरी यांना मिळाल्यावर सोमवारी त्यांनी पोलीस पथकासह छापा टाकला . त्याठिकाणी लोटस ऑनलाईन लॉटरी व झटपट लॉटरी नावाने बेकायदेशीर जुगार खेळवला जात होता. 

रोखीसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. जुगार खेळवणाऱ्या भैरूलाल पटेल (२२) रा. कासारवडवली, ठाणे व नरेंद्रकुमार पटेल (३८) रा. काशीमीरा ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Two caught gambling under the guise of lottery in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.