दोघा चेनस्रॅचरना संतप्त जमावाकडून बेदम चोप

By admin | Published: July 13, 2015 03:21 AM2015-07-13T03:21:11+5:302015-07-13T03:21:11+5:30

: ठाकुर्ली येथील रहिवासी नीलम चौधरी यांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दुकलीला आज येथील नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले.

Two chains of breathtaking crowd | दोघा चेनस्रॅचरना संतप्त जमावाकडून बेदम चोप

दोघा चेनस्रॅचरना संतप्त जमावाकडून बेदम चोप

Next

डोंबिवली : ठाकुर्ली येथील रहिवासी नीलम चौधरी यांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दुकलीला आज येथील नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले.
पती स्वप्नील यांच्यासमवेत त्या दवाखान्यात जात असताना पल्सरवरूनआलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी त्यांचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र निलम यांनी मंगळसूत्र घट्ट पकडून ओरडण्यास सुरुवात केली. ते पाहताच अल्ताफ असार जाफरीन (१६) आणि कासीम जाफरहुसेन जाफरी यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्वप्नील यांच्यासह अन्य काहींनी त्या दोघांना खाली पाडून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी दु. ४.१५ च्या सुमारास घडली. त्या दोघांनाही उपचारार्थ डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौधरी यांनी यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून त्यानुसार त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले. या दोघांवरही दरोड्याचा प्रयत्न, चोरीचा प्रयत्न, आणि ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणे, अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला. परंतु, ते अल्पवयीन असल्याने तपासात अडथळा येऊ शकतो, अशीही चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती. सहायक पोलीस उपायुक्त कालिदास सूर्यवंशी, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्या दोघांची इस्पितळात जाऊन चौकशी केली. सोमवारी त्यांच्यावर ज्युव्हेनाइल अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले. यापूर्वीही संतप्त जमावाने अशा चेनस्रॅचरला बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. तरीही हे प्रकार आटोक्यात येत नाहीत. ते वाढतच आहेत. यामुळे पोलीसही हाताश झाल्यासारखे वाटत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two chains of breathtaking crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.