शहापूर तहसीलदारांच्या सतर्कतेने रोखले दोन बालविवाह; समुपदेशाने गहिवरले उपस्थित वऱ्हाडी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 05:37 PM2021-04-04T17:37:19+5:302021-04-04T17:37:36+5:30

शहापूर व वाडा  तालुक्यात  दोन बालविवाह  होत असून शहापूरातील आश्रम शाळेत इयत्ता 8/9 मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुला मुलींचे ...

Two child marriages prevented by vigilance of Shahapur tehsildar; The bridegroom present at the meeting. | शहापूर तहसीलदारांच्या सतर्कतेने रोखले दोन बालविवाह; समुपदेशाने गहिवरले उपस्थित वऱ्हाडी.

शहापूर तहसीलदारांच्या सतर्कतेने रोखले दोन बालविवाह; समुपदेशाने गहिवरले उपस्थित वऱ्हाडी.

Next

शहापूर व वाडा  तालुक्यात  दोन बालविवाह  होत असून शहापूरातील आश्रम शाळेत इयत्ता 8/9 मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुला मुलींचे वाडा तालुक्यातील  चेंदवणीयेथे होणार असल्याची माहिती शहापूर च्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना मिळाली मिळालेल्या माहिती नुसार तहसीलदार सूर्यवंशी यांनी  शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलामुलीचे लग्न थांबवले पाहिजे यासाठी थोडा ही विलंब न करता तहसीलदारांनी स्थानिक तलाठी घागस, पोलीस पाटील , समाजसेवक सुभाष मोडक, शहापूर तहसील कार्यालयाचे  भूषण जाधव यांना विवाह स्थळी आघई गोरलेपाडा येथे पाठवले तिथे सर्व टीम पोहचल्यावर त्यांनी मुलीच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन समज देत विवाह थांबवण्याची  विनंती केली गांडूळवाड आश्रम शाळा  शहापूर येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तहसीलदार सूर्यवंशी यांनी अल्पवयीन  मुलीचे नातेवाईक यांच्याशी मोबाईल वर संभाषण करीत चर्चा केली या चर्चे दरम्यान च्या समुपदेशने मात्र मुलीचे वडील, मामा यांच्या सह सर्वच वऱ्हाडी  भावुक झालें..जुळलेला  विवाह  पुढच्या तारखेला  करण्याचे कबूल करीत  तहसीलदार व प्रशासनाचे आभार मानले.

तर  दुसरा विवाह  शहापूर गोठेघर येथील 17 वर्षीय मुलाचा विवाह जव्हार तालुक्यातील तिलोंदा येथे होणार होते या प्रकरणी तहसीलदार शहापूर यांनी वाडा, जव्हार येथील वरिष्ठ अधिकारी व शहापूर गोठेघर आश्रम शाळेतील मुख्यध्यपक यांना संपर्क करून  सदर बालविवाह रोखण्यात यश मिळवले.वेळीच वाडा, जव्हार तालुक्यातील प्रशासन विवाह स्थळी गेले व विवाह थांबवला  आजच्या कारवाईत तहसीलदार शहापूर यांनी  शिक्षण घेणाऱ्या  दोन अल्पवयीन मुलां मुलीं चे  बालविवाह रोखण्यात यश मिळवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे..

...अतिदुर्गम भागात समजप्रबोधनाची गरज

शहापूर, वाडा, जव्हार, मोखाडा, मुरबाड सारख्या बहुतांश अतिदुर्गम भागात बालविवाह केले जात आहेत. मुलगी 12 ते 14 वर्षाची झाली की तिचा विवाह केला जातो त्या वेळी मुलगा ही 15 ते 17 वर्षा आतील असतो परिणामी बालविवाह झाल्या मुळे कुपोषण, माता मृत्यू सारखे प्रकार ह्या तालुक्यात पाहावयास मिळत आहेत. परिणामी यासाठी समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेत समजप्रबोधन करून बालविवाह विरोधात चळवळ उभारणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
 

Web Title: Two child marriages prevented by vigilance of Shahapur tehsildar; The bridegroom present at the meeting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे