भिवंडीत खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू, साचलेल्या पाण्यात पोहणे बेतले जीवावर  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 06:22 AM2023-07-30T06:22:57+5:302023-07-30T06:24:31+5:30

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नारपोली परिसरात घडली होती. 

Two children died after drowning in a pit in Bhiwandi was swimming in stagnant water | भिवंडीत खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू, साचलेल्या पाण्यात पोहणे बेतले जीवावर  

भिवंडीत खड्ड्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू, साचलेल्या पाण्यात पोहणे बेतले जीवावर  

googlenewsNext

भिवंडी : माती खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पोगाव-डोंगरपाडा परिसरात घडली. 

अली शेख (१७) आणि सानीब अन्सारी (१६) अशी त्यांची नावे आहेत. अली आणि सानीब हे शांतीनगर परिसरात राहणारे होते. ते इतर तीन मित्रांसह पोगाव डोंगरपाडा येथे खड्ड्यात जमा झालेल्या पाण्यामध्ये आंघोळीसाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना इतर मित्रांनी तेथील नागरिकांना सांगितल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांनी सांगितले. अली व सानीब यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील दिवंगत इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नारपोली परिसरात घडली होती. 

Web Title: Two children died after drowning in a pit in Bhiwandi was swimming in stagnant water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.