उल्हासनगरात दोन मुलांवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला २६ ऑक्टोबर पर्यंत कोठडी

By सदानंद नाईक | Published: October 22, 2023 05:53 PM2023-10-22T17:53:53+5:302023-10-22T17:54:40+5:30

आरोपीला न्यायालयाने २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.

Two children molested in Ulhasnagar, case registered under POCSO, accused remanded till October 26 | उल्हासनगरात दोन मुलांवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला २६ ऑक्टोबर पर्यंत कोठडी

उल्हासनगरात दोन मुलांवर अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपीला २६ ऑक्टोबर पर्यंत कोठडी

उल्हासनगर : कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या ११ व १४ वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात बाबर नावाच्या इसमा विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला न्यायालयाने २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुला सोबत ओळखीच्या बाबर नावाच्या इसमाने अश्लिल कृत्य केल्याची माहिती नातेवाईक असलेल्या महिलेला मिळाल्यानंतर, त्यांनी बाबरला समजावून सांगून दम दिला. याप्रकारानंतर बाबर खडवली येथे राहण्यास जाऊनही, त्याचे परिसरात येणे जाणे होते. शनिवारी महिलेच्या ११ वर्षाच्या मुलावर बाबर याने अत्याचार केल्याचे, उघड झाल्यावर महिलेचा संताप अनावर झाला. महिलेने थेट उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून, ११ वर्षाचा मुलगा व १४ वर्षाच्या भासावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी काही तासात आरोपीला अटक केली. 

उल्हासनगर पोलिसांनी बाबर यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्यावर, या दोन मुला व्यतिरिक अन्य मुलावर अत्याचार केले का? याबाबत पोलीस तपास करीत आहेत. बाबर याला पोलिसांनी न्यायालया पुढे हजर केले असता, न्यायालयाने २६ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली असून सक्त कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Two children molested in Ulhasnagar, case registered under POCSO, accused remanded till October 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.