दोन मुलांना तीसाऱ्या मजल्यावरून खाली फेकले?; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, मुंब्रा येथील घटना
By कुमार बडदे | Updated: February 26, 2023 18:09 IST2023-02-26T18:09:25+5:302023-02-26T18:09:45+5:30
इमारतीमध्येच रहात असलेल्या एका व्यक्तीने त्यांना खाली फेकल्याचा आरोप इमारती मधील रहिवाशांनी केला आहे.

दोन मुलांना तीसाऱ्या मजल्यावरून खाली फेकले?; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, मुंब्रा येथील घटना
मुंब्राः येथील कौसा भागातील श्रीलंका परीसरातील माऊंट व्हू या इमारतीच्या तीस-या मजल्यावरुन जौहान सय्यद (वय ५ ) या मुलाला आणि झैनब अन्सारी (वय ७) या मुलांना खाली फेकण्यात आल्याची कथीत घटना उघडकीस आहे.
इमारतीमध्येच रहात असलेल्या एका व्यक्तीने त्यांना खाली फेकल्याचा आरोप इमारती मधील रहिवाशांनी केला आहे. यातील सय्याद याचा मृत्यू झाला असून,गंभिर जखमी झालेल्या झैनब वर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्याच्यावर मुलांना खाली फेकण्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याने मात्र मुलांना खाली फेकले नसल्याचा दावा केला आहे.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून,या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेले मुंब्रापोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटक यांनी ऐकून घटनाजन्य परिस्थितीचा आढावा घेतला असता,प्रथम दर्शनी मुलांना खाली फेकण्यात आल्याचे त्यांच्या निर्दशनास आले असून,जखमी मुलीच्या जबानी नंतर रविवारी रात्री पर्यत याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हटकर यांनी लोकमतला दिली.