महापालिका शौचालयाच्या छताचे प्लास्टर पडून दोन मुलं जखमी
By धीरज परब | Published: July 2, 2023 07:09 PM2023-07-02T19:09:36+5:302023-07-02T19:09:43+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर पडून १४ व ७ वर्षाची बालके जखमी झाली आहेत .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या छताचे प्लास्टर पडून १४ व ७ वर्षाची बालके जखमी झाली आहेत .
भाईंदर पश्चिमेस जय अंबे नगर झोपडपट्टी २ मध्ये पालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे . सदर शौचालयाच्या वरच्या दुसऱ्या मजल्यावर शौचालय साफसफाई करणारे राणा कुटुंब राहते . रविवारी त्या खोलीच्या छताचे प्लास्टर अचानक कोसळले . त्यावेळी खाली असलेला समीर राणा ( १४ ) व त्याची बहीण काफी (७) यांच्या अंगावर प्लास्टर कोसळल्याने दोघे हि जखमी होऊन रक्त निघू लागले . त्यांना उपचारासाठी डॉक्टर कडे नेण्यात आले .
सदर शौचालय धोकादायक बनले असून दुरुस्त करण्याची मागणी आम्ही लेखी पत्र देऊन केली होती परंतु पालिकेने ते गांभीर्याने घेतले नाही असे शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले . एकूणच शहरातील सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे .