ठाण्यातून दोन कोरोना रुग्ण बेपत्ता - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 05:35 PM2020-07-06T17:35:50+5:302020-07-06T17:37:19+5:30

सोमवारी फडणवीस हे ठाण्यात आले होते, यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण, संजय केळकर, प्रसाद लाड व भाजपचे ठाणो जिल्ह्या अध्यक्ष निरंजन डावखरे व इतर नगरसेवक उपस्थित होते.

Two Corona patients go missing from Thane - Devendra Fadnavis | ठाण्यातून दोन कोरोना रुग्ण बेपत्ता - देवेंद्र फडणवीस

ठाण्यातून दोन कोरोना रुग्ण बेपत्ता - देवेंद्र फडणवीस

Next

ठाणे  : एकीकडे कोरोनाचा मृत्यु दर लपविला जात आहे, तर दुसरीकडे आता ठाण्यातील कोरोनाचे दोन रुग्णच गायब झाले असल्याचा धक्कादायक  गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सोमवारी फडणवीस यांनी ठाण्यातील क्वॉरन्टाइन सेंटरला भेट दिली असता, रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना ही माहिती देऊन आमचे रुग्ण सापडत नसल्याचे त्यांना सांगितले. यावर फडणवीस यांनी हे रुग्ण हॉस्पीटलमधून अचानक कसे गायब झाले, असा सवाल उपस्थित करीत या रुग्णांचा प्रशासनाने लवकरात लवक र शोध घ्यावा अशी मागणी केली आहे.


सोमवारी फडणवीस हे ठाण्यात आले होते, यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रविंद्र चव्हाण, संजय केळकर, प्रसाद लाड व भाजपचे ठाणो जिल्ह्या अध्यक्ष निरंजन डावखरे व इतर नगरसेवक उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाईंदर पाडा येथील क्वॉरन्टांइन सेंटरला व साकेत येथील कोवीड केअर रुग्णालयाची देखील पाहणी केली. या पाहणीत रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या निदर्शनास ही माहिती आणून दिली. आधी तर मृत्युदर लपविली जात होता. परंतु आता रुग्णच गायब होण्याचे प्रकार घडत असतील तर प्रशासन काय काम करते याबाबतही शंका उपस्थित झाली असल्याचे तयंनी सांगितले. यावर उपाय म्हणून जीओ टॅगींग करणो गरजेचे असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी कॅमे:यांची व्यवस्था करणो गरेजेचे आहे, तसेच सीसीटीव्ही सारखी यंत्रणा उभारणे  गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या कमी होत आहेत, त्यातूनच रुग्णांना वेळेत उपाचर मिळत नाहीत, व पुढे जाऊन रुग्णांचा मृत्यु होत आहे, हे रोखणो गरजेचे असून चाचण्यांची संख्या वाढविणो गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यात करण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल दोन ते तीन दिवसांच्या अवधीने येतात. यातून रुग्णाची चिंता वाढते आणि त्याची प्रकृती देखील खालावत जाते. त्यामुळे संशयीत रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर कोवीडचे उपचार करावेत, आणि जेव्हा अहवाल पॉझीटीव्ह किंवा निगेटीव्ह येईल त्यानुसार पुढील उपचार करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

कल्याणमध्ये रुग्णांसाठी जागा नसल्याने व:हांडय़ातच रुग्णाला ऑक्सीजन लावले जात असून उपचार सुरु आहेत. ही गंभीर बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात कोवीड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. बाहेरुन अगदी हे रुग्णालय मस्त वाटत आहे, परंतु त्याठिकाणी आवश्यक असणारे मनुष्यबळ फारच कमी असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. दिखावा करण्यापेक्षा रुग्णांना वेळेत उपचार कसे मिळतील याकडे लक्ष देणो गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातही एक दोन महापालिका वगळल्या तर इतर महापालिका या राज्य सरकारवर अवलंबून आहेत. कल्याणमध्ये एक व्हेटींलेटर सुरु तर एक बंद आहे, उल्हासनगरमध्ये आयसीयु कमतरता आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यु वाढत आहेत, भिवंडीचीही हीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.


लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण नव्हते. त्यावेळी मार्चमधील मृत्यूची संख्या लक्षात घेता सद्यस्थितीत तब्बल 25 टक्के मृत्यू वाढले आहेत. मुंबईत 400 मृत्यूंची नोंद झालेली नाही. तीच स्थिती ठाण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. खाजगी रुग्णालयांकडून आजही लुट सुरु आहे, ती रोखण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करुन त्यांचे ऑडीटही करणो गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांच्यात समन्वयचा अभाव असल्याने कोरोना रुग्णांची योग्य ती माहिती उपलब्ध होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

गोव्यात कोरोना महामारीच्या काळात भाजप नेत्यांची ‘पार्टी’; Video व्हायरल

सरकारची चुक दाखविणाऱ्यावर भाजपवाला 'शिक्का'; फडणवीसांची टीका

ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका

लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

Read in English

Web Title: Two Corona patients go missing from Thane - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.