आक्षेपांवर दोन दिवसांची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:42 AM2021-02-10T01:42:50+5:302021-02-10T01:42:57+5:30

राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकांमध्ये एकमेव श्रीमंत बँक म्हणून या टीडीसी बँकेचा गवगवा आहे. या बँकेच्या २१ सदस्यांसाठी ३० मार्चला मतदान आहे.

Two-day hearing on objections | आक्षेपांवर दोन दिवसांची सुनावणी

आक्षेपांवर दोन दिवसांची सुनावणी

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : तब्बल साडेदहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची आहे. या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांचे प्रस्ताव विभागीय सहकारी संस्था सहनिबंधकांनी मागितले असता तब्बल तीन हजार मतदार संस्थांच्या यादीचे प्रस्ताव शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यामधील विविध त्रुटींच्या दुरुस्तीसाठी संबंधितांनी ५९ हरकती दाखल केल्या आहेत. त्यावर १० व ११ फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत सुनावणी घेतली जाईल, असे विभागीय सहनिबंधक अप्पाराव घोलकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकांमध्ये एकमेव श्रीमंत बँक म्हणून या टीडीसी बँकेचा गवगवा आहे. या बँकेच्या २१ सदस्यांसाठी ३० मार्चला मतदान आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आधीपासूनच सुरू झाली. आतापर्यंत सहकारी संस्था, पतसंस्था आदी मतदार असलेल्या संस्थांकडून मतदार यादींचे प्रस्ताव घेऊन त्यावरील आक्षेपांवर सुनावणीची प्रक्रिया आता आहे. मतदारयादीतील संस्थेचे, मतदाराचे नाव चुकले असल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधितांनी ५९ हरकती घेतल्या आहेत. त्यांच्यावर बुधवारी आणि गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे.

या मतदानासाठी प्राथमिक यादीत तब्बल तीन हजार मतदार निश्चित झालेले आहेत. त्यांना या बँकेच्या २१ संचालकांना मतदार करावे लागणार आहे. या मतदारांची अंतिम यादी १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार २६ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करतील. या प्राप्त उमेदवारी अर्जांची ५ मार्चला छाननी होऊन या बँकेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी ८ मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराला रंग चढणार आहे. 

नव्या संचालकांकडे सर्वांचे लक्ष
यंदाही सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक लढवणार असल्याचे बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. याआधीच्या विद्यमान २१ संचालकांपैकी अशोक पोहेकर, कृष्णा घोडा आणि वकील देविदास पाटील या तिन्ही संचालकांचे निधन झालेले आहे. त्यांच्या जागांसह उर्वरित मतदारसंघातून २१ नवीन संचालक बँकेवर कोण निवडून येणार त्यासाठी ३१ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
 

Web Title: Two-day hearing on objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.