भिवंडीत दोन दिवस पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 07:58 PM2021-09-16T19:58:32+5:302021-09-16T19:59:07+5:30
Bhiwandi News : भिवंडी पालिका हद्दीतील मानसरोवर पाण्याची टाकी तसेच वराळा पाण्याची टाकी येथून होणारा पाणीपुरवठा उद्यापासून शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नितिन पंडीत
भिवंडी - टेमघर येथील पाईप लाईनवर असलेल्या मेन वॉल दुरुस्तीचे काम मुंबई महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आले असल्याने भिवंडी पालिका हद्दीतील मानसरोवर पाण्याची टाकी तसेच वराळा पाण्याची टाकी येथून होणारा पाणीपुरवठा उद्यापासून शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून गुरुवारी देण्यात आली आहे.
शहरातील मानसरोवर, देवूनगर, हफिजी नगर, हुंडी कंपाऊंड, आझमी नगर, न्यू टावरे कंपाऊंड, अशोक नगर नारपोली, धामणकर नाका, पद्मानगर, सोनार पाडा, माधव नगर , सोमा नगर, अजंटा कंपाऊंड, कनेरी, तेली पाडा , पायल टॉकीज, गौरीपाडा, समदनगर, कारिवली रोड , हमाल वाडा, बंदर मोहल्ला, तांडेल मोहल्ला, मंगळ बाजार स्लॅब, खजुर पुरा , भोईवाडा नाचण कंपाऊंड, कारीवली रोड, तकिया अमानिषा, रोशन बाग, ईदगाह झोपडपट्टी, सौदागर मोहल्ला, वाजे मोहला, धोबी आळी, वाणी आली, ब्राह्मण आळी, कासार आळी, भिवंडी टॉकीज परिसर , ठाणगे आळी,अंबिकानगर, नजराना कंपाउंड, शिवाजी नगर, नवी चाल, बाजारपेठ, मंडई, कुंभार आळी, हफसन आली, तीन बत्ती निजामपुरा इत्यादी परिसरात होणारा पाणीपुरवठा त्यामुळे दोन दिवस बंद होणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.