दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ठाण्यात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:29 AM2019-01-10T03:29:42+5:302019-01-10T03:29:57+5:30
आझादनगर दशरथ पाटील मैदानाजवळ राहणारा प्रेमसिंह सिसोदिया (२५) हा ७ जानेवारी रोजी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने नाशिक ओव्हर ब्रिजवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरून जात होता.
ठाणे : दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. आझादनगर दशरथ पाटील मैदानाजवळ राहणारा प्रेमसिंह सिसोदिया (२५) हा ७ जानेवारी रोजी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून घोडबंदर रोडने नाशिक ओव्हर ब्रिजवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरून जात होता. त्याचवेळी त्याच्या मोटारसायकलला डाव्या बाजूने एका वाहनाने जोरदार धडक दिली. यात डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल न करताच या वाहनचालकाने तिथून पलायन केले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या प्रेमसिंह याला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आझादनगर येथील प्रदीपकुमार डीडवालिया यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अन्य एका घटनेमध्ये यशोधननगर येथून लोकमान्यनगर बस डेपोकडे जाणाºया सार्वजनिक रस्त्यावर सिंहगर्जना को-आॅप. हाउसिंग सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका तीसवर्षीय अज्ञात मोटारसायकलस्वाराला एका वाहनाने जोरदार धडक दिली. ही घटना ७ जानेवारी रोजी पहाटे ४.५० वा.च्या सुमारास घडली. या घटनेत या दुचाकीस्वाराच्या डोक्याला आणि डाव्या बरगडीला गंभीर मार लागला. यातच त्याचा मृत्यू झाला.
ओळख पटवण्याचे काम
च्पोलीस उपनिरीक्षक डी.ई. गोडे हे अधिक तपास करत आहेत. या अनोळखीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून कोणालाही या तीसवर्षीय तरुणाबाबत माहिती असल्यास त्यांनी वर्तकनगर पोलिसांशी संपर्क साधावा.