भिवंडीत एकाच जागेचे दोनदोन नकाशे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 05:22 AM2019-01-10T05:22:19+5:302019-01-10T05:22:42+5:30
नासिर मेहमूद सैय्यद यांची जमीन सर्व्हे क्र. २५/२ पैकी १०५६३/२०१८ अन्वये हद्द कायम करून नकाशा तयार केला आहे.
भिवंडी : टेमघर गावातील सर्व्हे क्र . २५/२ या जागेची मोजणी सन २०१० मध्ये तालुका भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करण्यात आली व जमिनीची हद्द व नकाशा कायम केला गेला. २०१८ मध्ये पुन्हा या जागेची मोजणी केली असता भ्रष्ट मार्गाचा अवलंब झाल्याने त्यात फेरफार करून चुकीचा नकाशा तयार केला, असा आरोप माजी नगरसेवक नासीर मेहबूब सैय्यद यांनी केला आहे. भूमिअभिलेख अधिकारी ठाणे येथील उपअधीक्षकांना नोटीस बजावली आहे.
नासिर मेहमूद सैय्यद यांची जमीन सर्व्हे क्र. २५/२ पैकी १०५६३/२०१८ अन्वये हद्द कायम करून नकाशा तयार केला आहे. असे असताना त्यांना न कळवता पोट हिस्सेदारांनी मोजणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून परस्पर जमिनीची मोजणी केली आहे, असा आरोप नासीर सैय्यद यांनी केला. दि. २०फेब्रुवारी २०१० रोजी केलेली मोजणी व दि. २ जून २०१८ रोजी केलेल्या मोजणी नकाशामध्ये तफावत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २०१०च्या सर्व्हे नं. २५/२ पै. मध्ये रस्ता व ग्लोरी इंग्लिश शाळेचे बांधकाम दाखवले आहे.
परंतु, २०१८ मध्ये केलेल्या मोजणीत रस्ता व ग्लोरी स्कुलचे बांधकाम दाखवण्यात आलेले नाही.