भिवंडीतील आगीच्या दोन घटना, डार्इंग व दुचाकी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:09 PM2018-12-31T18:09:46+5:302018-12-31T18:18:01+5:30

भिवंडी : भिवंडीत आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गोदाम पट्ट्यातील आगीच्या घटना ताज्या असतानाच भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली एमआयडीसी ...

 Two firefighters, fireworks and two-wheeler fire broke out in the morning | भिवंडीतील आगीच्या दोन घटना, डार्इंग व दुचाकी जळून खाक

भिवंडीतील आगीच्या दोन घटना, डार्इंग व दुचाकी जळून खाक

Next
ठळक मुद्देसरवली एमआयडीसी येथील उजागर प्रिंटिंग अँड प्रोसेसिंग डार्इंग कंपनीस आगनारपोली वहातूक पोलीस कार्यालयामागील दुचाकी व रिक्षा जळून खाक दोन्ही आगीच्या घटना संशयाच्या घे-यात

भिवंडी : भिवंडीतआगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गोदाम पट्ट्यातील आगीच्या घटना ताज्या असतानाच भिवंडी-कल्याण मार्गावरील सरवली एमआयडीसी येथील उजागर प्रिंटिंग अँड प्रोसेसिंग या डार्इंग कंपनीस व अंजूरफाटा येथे नारपोली वहातूक पोलीस कार्यालयामागे दुचाकी व रिक्षा जळून खाक झाल्या आहेत.
सरवली एमआयडीसीमध्ये कापडावर प्रक्रिया करणाऱ्या उजागर प्रिंटिंग व प्रोसेसिंग प्रा.ली. या बंद कंपनीत साडेपाच वाजता लागलेली आग आतल्या आत धुमसत होती. सुमारे एक तासाने या घटनेची माहिती कोनगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांना मिळाल्यानंतर त्यांनी भिवंडी व कल्याण अग्निशामक दलास दिल्यानंतर दिड-दोन तासांनी घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या . तोपर्यंत तळमजल्यावर लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केले आणि आगीच्या ज्वाला कंपनीच्या तीन मजली इमारतीत पसरल्या.पाण्याचा मारा वरच्या मजल्या पर्यंत मारणे जवानांना शक्य होत नसल्याने या मजल्यावरील कापड जळून खाक झाले. सुदैवाने एमआयडीसीतील इतर कंपनीमधून पाण्याची उपलब्धता होत असल्याने या आगीवर सतत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात ठेवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.तरी देखील दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नाही. संपुर्ण आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे पाच ते सात तासाचा वेळ लागणार असल्याची माहिती अग्निशामक दलाचे कल्याणचे अधिकारी चौधरी यांनी दिली आहे. सदर कंपनी बंद असताना अचानकपणे आग लागल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
तर दुसरी घटना अंजूरफाटा येथील नारपोली वहातूक शाखेच्या कार्यालयामागे घडली. त्यामध्ये ६ दुचाकी ,१ रिक्षा व त्या जवळील झाडाला काल रात्री दरम्यान अचानकपणे आग लागली. ही आग जवळच असलेल्या मनपाच्या अंजूरफाटा अग्निशामकदलाच्या जवानांनी विझविली. या घटनेप्रकरणी वहातूक पोलीसांनी नारपोली पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बेवारस व भंगार सहा दुचाकी व एक रिक्षा गेल्या काही वर्षापासून कार्यालयामागे खितपत पडल्या होत्या. मात्र पोलीसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. वास्तविक महानगरपालिका आयुक्त,सहाय्यक पोलीस आयुक्त व वहातूक पोलीस यांची संयुक्त बैठक होऊन बेवारस वहाने पालिकेकडे जमा करण्यासाठी मोहिम सुरू केली होती. परंतू या मोहिमेकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे या घटनेवरून सिध्द झाले आहे. तसेच पोलिसांच्या आवारातील जप्त केलेल्या गाड्या जर सुरक्षीत नसतील तर शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या दुचाक्या कश्या सुरक्षीत राहतील?अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. दरम्यान वहातूक पोलीसांनी ही वहाने बेवारस असल्याचे सांगत ही वहाने जाळणा-या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून आपली सुटका करून घेतली आहे.

Web Title:  Two firefighters, fireworks and two-wheeler fire broke out in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.