ठाण्यातील एका दुकानासह घराला शॉटसर्कीटमुळे आग: अग्निशमन दलाच्या तीन जवानांसह सातजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 01:01 AM2021-01-10T01:01:37+5:302021-01-10T23:09:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका दुकानाला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ...

Two firefighters injured while trying to control fire in Thane | ठाण्यातील एका दुकानासह घराला शॉटसर्कीटमुळे आग: अग्निशमन दलाच्या तीन जवानांसह सातजण जखमी

रामनगर येथील दोन दुकानाला आग

Next
ठळक मुद्दे आगीमध्ये सिलेंडरचा स्फोटदुकानासह घराचेही मोठया प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका दुकानाला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत आगीवर नियंत्रण मिळवितांना ठाणे अग्निशमन दलाचे लिडींग फायरमन शरद कदम (५६), जवान दीपेश पेटकर (२६) आणि शीघ्र कृती वाहनाचे चालक प्रसाद सुतार (२५) यांच्यासह सात जण जखमी झाले. त्यांच्यावर स्थानिक रु ग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट, रामनगर येथील तळ अधिक एक मजली असलेल्या ‘मर्द मराठा आॅटो स्पेअर पार्ट’ या दुकानासह बाजूलाच असलेल्या एका घराला ९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची ही माहिती मिळताच प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाणे महापालिकेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन फायर इंजिन, दोन रेस्क्यू वाहने आणि एका वॉटर टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी वागळे इस्टेट अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्याचवेळी रामसिंग यादव यांच्या घरातील एलपीजी सिलेंडरचा आगीमुळे स्फोट झाला. याच स्फोटामुळे लीडींग फायरमन कदम यांच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या. त्यांचे सहकारी पेटकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाले. तर वाहन चालक प्रसाद सुतार यांच्यासह नितीन कदम (२०), केशव सकपाळ (५५), रोहन पांढरे(२१) आणि मंगेश कदम (४०) हे स्थानिक नागरिकही आग विझवितांना जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे दोन ते तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान, या आगीमध्ये मोठया प्रमाणात घरासह दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
* शॉटसर्कीटमुळे आगीची शक्यता:
आगीचे नेमकी कारण समजू शकले नसले तरी शॉटसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. स्पेअर पार्टच्या दुकानांमध्ये असलेल्या आॅईलच्या डब्यांमुळेही आगीचा मोठा भडका उडाला. त्यात दुकानाच्या वर असलेल्या घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्यामुळे आगीमध्ये आणखी भर पडली. या आगीची चौकशी करण्यात येत असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.

Web Title: Two firefighters injured while trying to control fire in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.