अंबरनाथमध्ये दुहेरी हत्याकांड; दोघा मित्रांची अज्ञाताने केली हत्या
By पंकज पाटील | Updated: February 17, 2024 16:56 IST2024-02-17T16:55:18+5:302024-02-17T16:56:58+5:30
अंबरनाथ पूर्वेच्या दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे.

अंबरनाथमध्ये दुहेरी हत्याकांड; दोघा मित्रांची अज्ञाताने केली हत्या
पंकज पाटील,अंबरनाथ: पूर्वेच्या दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. सुरज परमार आणि सुरज कोरी या दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून हत्या करण्यात आले आहे.
रात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने दुर्गापाडा परिसरात एकच खळबळ उडालीय. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या बि जी छाया उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाचा तपास शिवाजीनगर पोलीस आणि उल्हासनगर क्राईम ब्रँच कडून सुरु करण्यात आला आहे. ही हत्या का झाली ? कशी झाली? आणि का करण्यात आली ? याबाबत विविध अंदाज लावले जात आहेत. दरम्यान मृत झालेल्या दोन्ही व्यक्ती त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे.