दिवा-शिळा रस्त्यावरील खर्डी गावात चिंध्यांची दोन गोदामे जळून खाक
By कुमार बडदे | Updated: February 28, 2023 20:05 IST2023-02-28T20:05:09+5:302023-02-28T20:05:16+5:30
मुंब्राः दिवा-शिळ रस्त्या जवळील खर्डी गावातील साईसृष्टी हाईटस या इमारती समोर असलेल्या चिंध्या जमा करुन ठेवलेल्या दोन गोदामांना मंगळवारी ...

दिवा-शिळा रस्त्यावरील खर्डी गावात चिंध्यांची दोन गोदामे जळून खाक
मुंब्राः दिवा-शिळ रस्त्या जवळील खर्डी गावातील साईसृष्टी हाईटस या इमारती समोर असलेल्या चिंध्या जमा करुन ठेवलेल्या दोन गोदामांना मंगळवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारस आग लागली.
स्थानिक रहिवासी तसेच गोदाम मालकांनी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जावानांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या जवानांनी तीन फायर वाहने तसेच एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी संध्याकाळी पावणेसात वाजता आग पूर्णपणे विझवली.या आगीत १० बाय ३० फूट आकाराची चिंध्याची दोन्ही गोदामे जळून खाक झाली.सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी तसेच शिळ अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी पि.डी.पाटील यांनी दिली.