चिखलामुळे मुंबई नाशिक महामार्गाचा दोन तास खोळंबा, ठाण्यातील साकेत ब्रिजवरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 07:20 PM2022-05-17T19:20:26+5:302022-05-17T19:21:07+5:30

Mumbai-Nashik highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबईकडून नाशिककडे जाणा-या वाहिनीवर एका ट्रकमधून चिखल पडल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील साकेत ब्रीज जवळ घडली.

Two hours delay on Mumbai-Nashik highway due to mud, incident on Saket bridge in Thane | चिखलामुळे मुंबई नाशिक महामार्गाचा दोन तास खोळंबा, ठाण्यातील साकेत ब्रिजवरील घटना

चिखलामुळे मुंबई नाशिक महामार्गाचा दोन तास खोळंबा, ठाण्यातील साकेत ब्रिजवरील घटना

Next

ठाणे- मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबईकडून नाशिककडे जाणा-या वाहिनीवर एका ट्रकमधून चिखल पडल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील साकेत ब्रीज जवळ घडली. या चिखलामुळे महामार्गावरील वाहतूकीला तब्बल दोन तास अडथळा निर्माण झाला होता. याचा फटका शहरातील वाहतूकीवरही झाल्याचे पहायला मिळाले.

ठाणे शहरातून जाणाºया मुंबई-नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाºया वाहिनीवर मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका ट्रकमधून चिखल नेला जात होता. हा ट्रक साकेत ब्रिजजवळ आल्यावर त्यातील बराचसा चिखल अचानक रस्त्यावर पडला. ही माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक नियंत्रण शाखेच्या कापूरबावडी उप विभागाचे पथक, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. रस्त्यावर चिखल मोठया प्रमाणात पसरल्याने तो एका बाजूला करण्यासाठी एका जेसीबी मशिनसह एक रेस्क्ूय वाहन तसेच अग्निशमन दलाच्या वाहनालाही पाचारण केले होते. या चिखलावर अग्निशमन दलाच्या फायर वाहनातील होज पाईपच्या मदतीने पाण्याचा फवारा मारण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या मदतीने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील चिखल अखेर बाजूला करण्यात यश आले.

या चिखलामुळे महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला. शिवाय, मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या साकेत ब्रीज पासून कॅडबरी सिग्नलपर्यंत तसेच घोडबंदर रोडवरील माजिवाडा ब्रीजपासून ब्रम्हांड सिग्नलपर्यंत सुमारे एक तासांहून अधिक काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने मुंबई-नाशिक महामार्ग आणि घोडबंदर रोड या सर्वच मार्गावरील वाहतूकीचा मार्ग मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

Web Title: Two hours delay on Mumbai-Nashik highway due to mud, incident on Saket bridge in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.