भिवंडीत आगीच्या दोन घटना; सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 12:24 AM2020-10-04T00:24:35+5:302020-10-04T00:25:05+5:30
शॉर्ट सर्कीटने आग लागल्याचा अंदाज
- नितिन पंडित
भिवंडी ( दि. ३ ) भिवंडी शहरासह ग्रामीण भागात आगी लागण्याचे सत्र सुरूच असून शनिवारी एका इलेक्ट्रॉनिक वस्तू साठवलेल्या गोदामासह एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही ठिकाणच्या आगी विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तर या आगींचे नेमके कारण अजून समजले नसले तरी शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने आगीच्या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पहिल्या घटनेत तालुक्यातील वळपाडा परिसरातील पारसनाथ काॅम्लेक्स येथे असलेल्या प्लाॅस्टीक बोर्ड व इलेक्ट्रानिक साहित्य साठवुन ठेवलेल्या गोदामाला रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीत गोदामातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जाळून खाक झाले आहेत.
तर दुसऱ्या घटनेत शहरातील भंडारी कंपाउंड येथील मारू कंपाउंड परिसरात असलेल्या यंत्रमाग कारखानाला रात्री दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. यंत्रमाग कारखान्याला लागलेल्या आगीत यंत्रमाग कारखान्यासह वारपीन कारखान्याला आग लागल्याने येथील कापड व धागे जळून खाक खाक झाला आहे. दोन्ही ठिकाणी अग्निशम दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु .