उल्हासनगरात ओला चालकांना लुटल्याच्या दोन घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:44 AM2021-08-25T04:44:45+5:302021-08-25T04:44:45+5:30
उल्हासनगर : ओला टॅक्सीचालकांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याचे दोन गुन्हे घडल्याने, ओलाचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी रिषी डे ...
उल्हासनगर : ओला टॅक्सीचालकांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याचे दोन गुन्हे घडल्याने, ओलाचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी रिषी डे यांच्यासह साथीदारावर हिललाईन पोलीस ठाण्यात सोमवारी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
रविवारी मध्यरात्री दीड वाजता रिषी डे नावाच्या इसमाने ओला टॅक्सी बुक केल्याने चालक मोहम्मद सलीम खान कॅम्प नं-५ येथील गुरुद्वाराजवळ आले. त्यावेळी रिषी डे नावाच्या इसमाने साथीदारांच्या मदतीने ओलाचालक मोहम्मद खान यांना मारहाण करून रोख रक्कम, मोबाईल असा १८ हजार ३२० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या घटनेत पुन्हा रिषी डे नावाच्या इसमाने ओला टॅक्सी बुक करून रविवारी मध्यरात्री साडेतीन वाजता कॅम्प नं-५ येथील तानाजीनगर येथे चालकास बोलाविले. चालक अंजनीकुमार दुबे गाडी घेऊन आले असता, रिषी डे याने साथीदारांच्या मदतीने दुबे यांना मारहाण करून चाकूच्या धाकावर रोख रक्कम व मोबाईल असा एकूण १९ हजार २३८ रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी पुन्हा रिषी डेसह साथीदारावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.