दिवा येथील इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे जखमी
By जितेंद्र कालेकर | Updated: July 14, 2024 15:22 IST2024-07-14T15:22:26+5:302024-07-14T15:22:54+5:30
दिवा येथील केटी कॉम्प्लेक्समधील नवीन प्लाझा या सात मजली इमारतीमधील ७०४ क्रमांकाच्या खोलीतील बेडरुमचे स्लॅबचे प्लास्टर पडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती.

दिवा येथील इमारतीचा स्लॅब कोसळून दोघे जखमी
ठाणे: दिवा येथील एका अनधिकृत सात मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील एका सदनिकेच्या स्लॅबचे प्लास्टर पडून अंकित सिंग ( २८) आणि सोनम सिंग (२६ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दोघांनाही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
दिवा येथील केटी कॉम्प्लेक्समधील नवीन प्लाझा या सात मजली इमारतीमधील ७०४ क्रमांकाच्या खोलीतील बेडरुमचे स्लॅबचे प्लास्टर पडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती. या इमारतीचे बांधकाम आठ ते दहा वर्षांपूर्वीचे आहे. या घटनेत अंकित यांच्या डोक्याला आणि उजव्या हाताला दुखापत झाली. तर सोनम यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या दोघांवरही उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.