कोसळलेले झाड कापताना दोन जवानांना कुत्र्याचा चावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:08 IST2025-01-24T06:07:52+5:302025-01-24T06:08:08+5:30
Thane: गावदेवी बस स्टॉपच्या आवारात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक कोसळलेले झाड कापताना रवींद्र शेळके (३७) आणि सूर्यवंशी विसपुते (२६) या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला.

कोसळलेले झाड कापताना दोन जवानांना कुत्र्याचा चावा
ठाणे - गावदेवी बस स्टॉपच्या आवारात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक कोसळलेले झाड कापताना रवींद्र शेळके (३७) आणि सूर्यवंशी विसपुते (२६) या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. भटक्या कुत्र्याने जवानांच्या उजव्या पायाला चावा घेतला असून, जखमी जवानांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
बुधवारी रात्री चंद्रकांत भालेराव यांनी मोबाइलवरून गावदेवी बस स्टॉप येथे झाड पडल्याची माहिती दिली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पडलेले झाड कापत असताना अग्निशमन दलाच्या दोन जवानांवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. दरम्यान, झाडाचा धोकादायक भाग अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांमार्फत कापण्यात आला आहे.