सोशल मीडियावर महिलेला त्रास देणाऱ्या दोघांची हत्या; कसारा घाटातच मृतदेह फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 11:42 PM2023-08-25T23:42:22+5:302023-08-25T23:42:26+5:30
एकच दिवशी दोन मृतदेह भेटल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळ भेट देत तपास यंत्रणा कार्यन्वीत केली.
शाम धुमाळ
कसारा - कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात व्यक्तीचे मृतदेह मुंबई - नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्यात फेकले असल्याची माहिती कसारा पोलिसांना १९ जून रोजी सकाळ च्या सुमारास मिळाली होती. ही माहिती मिळताच कसारा पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेेतली
पहिला मृतदेह नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट व दुसरा मृतदेह वाशाळा फाटा या ठिकाणी सापडला होता दोन्ही मृतदेहा बाबत पोलिसांनी डॉग स्कॉड,फिंगर प्रिंट एक्सपर्ट ,फॉरेनसिक लॅब ला पाचरन करून पंचनामा केला असता त्यांचा खून करून मृतदेह घाटात फेकल्याचे निदर्शनात आले त्या नुसार कसारा पोलिसांनी मृतदेह शवविचेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु केला .एकच दिवशी दोन मृतदेह भेटल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळ भेट देत तपास यंत्रणा कार्यन्वीत केली.
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली धाटे, उपविभागीय पोलीस अधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश तडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश मनोरे यांनी तपास पथक तयार करून मयता चे वारस यांचा तपास दुसऱ्याच दिवशी केला. त्यानंतर मिळालेल्या तांत्रिक माहिती नुसार पोलिसांनी दोन पथक तयार करून शिर्डी जवळील लोणी परिसरात तपास सुरु केला. तब्बल दोन महिन्याच्या अथक मेहनतीनंतर पोलिसांना हुलकवणी देणाऱ्या 4 आरोपींना आज शिर्डी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. मनोज शिवप्पा नाशी वय 24 , कुणाल प्रकाश मुदलियार वय 23, प्रशांत अंबादास खुलुले वय 25 . फिरोज दिलदार पठाण वय 19 सर्व राहणार राम नगर ,शिर्डी.अशी अटक केलेल्या आरोपीची नावे असून आरोपीनी आपला गुन्हा कबूल केला असून 4 जणांनी दोघांचा खून केल्याची कबुली दिली आहे.
मानलेल्या बहिणीला सोशल मीडियावर त्रास देत असल्याने केला खून.
दरम्यान या दुहेरी खुनातील मुख्य आरोपी मनोज नाशी याच्या लोणी येथील मानलेल्या बहिणीस मयत सुफीयान सिराबक्ष घोणे वय 33 रा.लोणी, व साहिल पठाण वय 21 रा.सोनगाव हे अनेक दिवसापासून सोशल मीडियावर आरोपीच्या मानलेल्या बहिणीला त्रास देत होते याचा राग मनात ठेवून मुख्य आरोपी मनोज याने आपल्या साथी दारांच्या मदतीने शिर्डी परिसरात सुफीयाना घोणे व साहिल पठाण यांचा खून केला व त्यांचा मृतदेह चादरीत गुंडाळून तो कसारा घाटात वेगवेगळ्या ठिकाणी फेकला असल्याची कबुली आरोपीनी पोलिसांना दिली.
या दुहेरी हत्याकांडातील आरोपी दोन महिन्याच्या अथक मेहनती नंतर अटक करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे,सहाय्य्क पोलीस निरीक्षक भास्कर जाधव,महेश कदम,प्रकाश साहिल,गोविंद कोळी,संतोष सुर्वे,सुनील कदम,स्वप्नील बोडके,सतीश कोळी, कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलमान खातीब,पोलीस कर्मचारी अनिल निवळे,संदीप माळी यांचे कौतुक होत असून समज माद्यमावर बहिणीची छेड काढणाऱ्या दुखली चा खून करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकणाऱ्या आरोपीना न्यायालयात् हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठंडी देण्यात आल्याचे समजते.